शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

फुप्फुसाचा कर्करोग ठरतेय मृत्यूचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

नागपूर : हवेतील प्रदूषण, धूम्रपानाची सवय यामुळे फुप्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे. भारतात पूर्वी फुप्फुसाचा कॅन्सर हा आठव्या स्थानी ...

नागपूर : हवेतील प्रदूषण, धूम्रपानाची सवय यामुळे फुप्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे. भारतात पूर्वी फुप्फुसाचा कॅन्सर हा आठव्या स्थानी होता, आता तो चौथ्या स्थानावर आला आहे. धक्कादायक म्हणजे, ८५ टक्के या कॅन्सरचे रुग्ण तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात उपचारासाठी येत असल्याने मृत्यूचे कारण ठरत आहे. यातच कोरोनामुळे ‘लंग फायब्रोसिस’चे रुग्ण वाढले आहेत. यामुळे फुप्फुसाच्या आजाराचे वेळीच निदान करून उपचार घ्या, असे आवाहन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी येथे केले.

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या रेस्पिरेटरी मेडिसीन विभागाच्या वतीने शनिवारी जागतिक फुप्फुस दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. विकास महात्मे होते. मंचावर रेस्पिरेटरी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम, फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. उमांजली दमके व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. संजय पराते उपस्थित होते.

खा. डॉ. महात्मे यांनी फुप्फुसाच्या कर्करोगाविषयी अधिक जनजागृती होण्याची गरज लक्षात आणून दिली. ते म्हणाले, जे लोक धूम्रपान करत नाहीत; पण धूम्रपान करणाऱ्यांच्या आसपास राहून स्वत:चा जीव धोक्यात घालतात त्यांनाही कर्करोगाची लागण होऊ शकते. हा धूर आपल्या फुप्फुसासाठी विषाप्रमाणेच असतो. एका रिसर्चनुसार, ‘सेकंड हँड स्मोकिंग’मुळे जास्त प्रमाणात नुकसान पोहोचते, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. दमके यांनी श्वसनरोगावर फिजिओथेरपीचे महत्त्व विशद केले. डॉ. शिल्पा गुप्ता यांनी श्वसनरोग व प्राणायाम याची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. मेश्राम यांनी केले, तर आभार डॉ. सुशांत मुळे यांनी मानले.

-धूम्रपानाला नाही म्हणा : डॉ. मेश्राम

डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, धूम्रपानामध्ये चार हजारांपेक्षा जास्त घातक पदार्थ असतात, जे कर्करोगाला कारणीभूत ठरतात. म्हणूनच धूम्रपानाला नाही म्हणा. धूम्रपान सोडल्यास फक्त २० मिनिटांमध्ये हृदयाची गती सामान्य होते. २ ते १२ आठवड्यांमध्ये फुप्फुसाचे रक्ताभिसरणाची क्षमता वाढते. १ ते ९ महिन्यांमध्ये दम लागणे थांबते. ५ ते १५ वर्षांमध्ये लकवा होण्याची शक्यता कमी होते. दहा वर्षांत फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता निम्म्याने कमी होते.