शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पाच रुपयात लंचबॉक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:41 IST

सामान्य, गरजू लोकांसाठी शिवसेनेने एक रुपयात झुनका भाकर ही योजना सत्तेत असताना राबविली होती. त्याच धर्तीवर नागपुरात आता पाच रुपयात लंचबॉक्स या उपक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्दे रुग्णांच्या नातेवाईकांकरिता अभिनव सामाजिक उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य, गरजू लोकांसाठी शिवसेनेने एक रुपयात झुनका भाकर ही योजना सत्तेत असताना राबविली होती. त्याच धर्तीवर नागपुरात आता पाच रुपयात लंचबॉक्स या उपक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे. परंतु हा उपक्रम खास रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आहे. शहरात धंतोली, रामदासपेठ हा परिसर हेल्थ हब झाला आहे. राज्याच्या बाहेरूनही येथे मोठ्या संख्येने रुग्ण येत आहे. बरेचदा पैशाच्या अभावी त्यांचे नातेवाईक पोटाला चिमटा देतात. अशांना पाच रुपयात तीन चपात्या आणि भाजी हा लंचबॉक्स मिळाल्यास मोठा आधार होणार आहे.ही संकल्पना नगरसेवक संदीप जोशी यांची आहे. युवा झेप प्रतिष्ठान हा उपक्रम राबविणार आहे. धंतोली आणि रामदासपेठ या परिसरात लहानमोठी जवळपास ३०० रुग्णालये आहेत. येथे उपचार करणाºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या उपक्रमाला धंतोली परिसरातून सुरुवात होणार आहे. संचालन जरी संस्था करीत असली तरी, सामाजिक भान जपणाºया नागपूरकरांच्या माध्यमातूनच उपक्रमाला बळ मिळणार आहे. त्यासाठी शहरातील २०० हून अधिक प्रतिष्ठित नागरिकांचा सर्वे केला आहे.त्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. धंतोलीतील गोरक्षण येथे या उपक्रमाचे काऊंटर राहणार आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये या योजनेची प्रसिद्धी करणार आहे. डॉक्टरांना उपक्रमासंदर्भात पत्र देणार आहे. बचतगटाकडून अन्न बनवून घेणार आहे. सुरुवातीला दुपारी १२ ते २ या वेळेत हे काऊंटर सुरू राहणार आहे. पुढे उपक्रमाला प्रतिसाद मिळाल्यास रात्री सुद्धा हा उपक्रम सुरू करण्यात येईल.आपणही लावू शकता हातभारगेल्यावर्षी माझ्या वाढदिवसाला ७०० च्या वर बुके आले होते. पुढे ते डस्टबिनमध्ये गेले. त्यामुळे यावर्षी माझ्या वाढदिवसाला कुठलाही केक, बुके न आणता या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमात माझ्या जवळचीच मंडळी नाही, तर समाजभान जपणारे नागपूरकर सुद्धा सहभागी होऊ शकतात. सहकार्याच्या रुपात लंचबॉक्ससाठी लागणारा शिधा देऊ शकतात. एका वेळेचा मासिक लंचबॉक्सचा खर्च ६०० रुपये येतो. त्यासाठी १२ महिन्याचे धनादेश देऊ शकता. आवडत्या व्यक्तीचे जन्मदिवस, दिवंगत व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ योगदान देऊ शकता. आपल्या मदतीमुळे गरीब रुग्णांच्या दु:खात बुडालेल्या नातेवाईकांना प्रेमाचे दोन घास मिळणार आहे. त्याच माध्यमातून नागपूरकरांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडणार आहे.- संदीप जोशी, अध्यक्ष, युवा झेप प्रतिष्ठान