शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात तो झाला वेडा पिसा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विवाहित महिलेच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या एका तरुणाने स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विवाहित महिलेच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या एका तरुणाने स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना घडली.

दीपक संजय पाटील (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यातील येनगाव (बोदवड) येथील रहिवासी आहे. बेलतरोडीतील दोन मुलांची आई असलेल्या ३५ वर्षांच्या एका महिलेसोबत त्याची फेसबुकवर ओळख झाली. नंतर टॅक्सी ड्रायव्हर असलेला पाटील गेल्यावर्षी नागपुरात आला. त्याने महिलेशी संपर्क साधून तिचा पत्ता जाणून घेतला आणि तिच्या घरी पोहोचला. तेथे त्याने जाणे-येणे वाढविल्याने या दोघांचे सूत जुळले. बरेच दिवस त्यांचे अनैतिक संबंध गुपचूप सुरू होते. ३० जुलै २०२० ला त्याने या महिलेला जळगावला पळवून नेले. महिलेच्या नवऱ्याने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोबाइलवरून माग काढून जळगाव गाठले. तेथे त्यांनी महिलेला विचारपूस केली असता मी स्वमर्जीने पाटीलसोबत आली आणि आता मला परत यायचे नाही. पाटीलसोबतच राहायचे आहे, असे तिने सांगितले. त्यामुळे पोलीस हात हलवत परत आले. दरम्यान, तब्बल सात महिने हे दोघे जळगावला पती-पत्नीसारखे राहत होते. नंतर त्यांच्यात खटके उडाल्याने तीन आठवड्यांपूर्वी ही महिला नागपुरात आपल्या घरी परतली. मोठ्या मनाच्या नवऱ्यानेही तिला स्वीकारले आणि घरी ठेवून घेतले. सर्व सुरळीत असताना आता तीन दिवसांपूर्वी पाटील पुन्हा नागपुरात परतला. त्याने महिलेचे घर गाठले. तेथेच दोन दिवस मुक्काम ठोकला आणि तिला सोमवारी दुपारी आपल्या सोबत जळगावला घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करू लागला. महिलेने नकार दिला. त्यामुळे त्याने तिच्याशी वाद घालून तिच्या घरातील भाजी कापण्याच्या चाकूने आपल्या दोन्ही हातांच्या नसा कापून घेतल्या. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली, तर तिच्या पतीने बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून जखमी आरोपी पाटीलवर उपचार करून घेतले. त्यानंतर महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून त्याने आरोपी पाटीलविरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

---

... हिच्या वाचून करमेना !

पोलिसांनी आरोपी पाटीलला विचारणा केली असता त्याने ''हिच्या वाचून मी जगू शकत नाही. मला करमतच नाही,'' असे सांगितले. पोलिसांनी त्याची कशीबशी समजूत घालून त्याला जळगावला पाठवून दिले.

---