शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश भट सभागृहासह परिसराचा ‘लूक’ बदलतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:34 IST

नागपूर शहराच्या वैभवात भर टाकणाºया ७५ कोटींच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते होत आहे. या समारंभाची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.

ठळक मुद्देतयारी राष्ट्रपतींच्या स्वागताची : मनपा प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराच्या वैभवात भर टाकणाºया ७५ कोटींच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते होत आहे. या समारंभाची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. सभागृहाच्या सजावटीचे काम सुरू आहे. सोबतच परिसराच्या सजावटीचे काम हाती घेण्यात आले आहे.सुटीचा दिवस असूनही रविवारी भट सभागृहासमोरील दुभाजक दुरुस्ती व झाडे लावण्यासाठी कुंड तयार करण्याचे काम सुरू होते. रेशीमबाग मैदानातील पाणी थेट सभागृहालगतच्या भागात जमा होते. यासाठी पावसाळी नाली बांधण्यात आलेली नाही. नालीचे काम हाती घेण्यात आले आहे.तसेच सभागृहाच्या परिसरातील लॅन्ड स्केपींग, हिरवळ व रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाची विस्तृत माहिती अद्याप महापालिका प्रशासनाला मिळालेली नाही. परंतु २२ सप्टेंबरला राष्ट्रपती नागपूर दौºयावर येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली आहे. त्यानुसार आयुक्त अश्विन मुदगल यांनी नियोजन केले आहे. राजभवन ते रेशीमबाग दरम्यानचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.या मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकाºयांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सोमवारपासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्याहस्ते सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच ते दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस येथे जाणार आहे. त्यांचा दौरा विचारात घेता तयारी सुरू आहे.हवाई मार्गाचा पर्यायनागपूर शहरात मेट्रो रेल्वे, सिमेंट रोड, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरक्षेचा विचार करता राष्ट्रपतींच्या हवाई मार्गाचाही विचार सुरू आहे. सैन्याच्या हेलिकॉप्टरचा वापर करून ते ड्रॅगन पॅलेस व रामटेकला जाऊ शकतात.