शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; एस्पा कायदा रद्द करणार नाही, दुरुपयोग रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 10:41 IST

काँग्रेस सत्तेत आल्यास ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट’ (एस्पा) कायदा रद्द करणार नाही, तर त्याचा दुरुपयोग रोखणार आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची स्पष्टोक्ती

आनंद शर्मा/श्रेयस होले ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस सत्तेत आल्यास ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट’ (एस्पा) कायदा रद्द करणार नाही, तर त्याचा दुरुपयोग रोखणार आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले. भाजपला हा मुद्दा उचलण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारण, भाजपाने स्वत:च तीन राज्यातून एस्पा कायदा हटवलेला आहे आणि निवडणुकीनंतर अरुणाचल प्रदेशातूनही हा कायदा हटविण्याचे आश्वासन देत आहे, असेही त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी ते नागपुरात आले त्यांनी ‘ लोकमत’शी विशेष बातचित केली. यावेळी खरगे यांनी ‘काँग्रेस क्रॉस होल्डिंग आॅफ मीडिया व्यवस्थेलाही संपवणार असल्याचे सांगितले. देशद्रोहाच्या कायद्याबाबत पक्षाचे धोरण स्पष्ट करताना ते म्हणाले, या कायद्याच्या नावावर अनावश्यक पद्धतीने लोकांना त्रस्त केले जात आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. परंतु त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचे स्वातंत्र्य संपवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. काँग्रेसला देशद्रोहाच्या कायद्याचा चुकीच्या वापराबद्दल आक्षेप आहे. मोदी सरकार स्वत:ला प्रामाणिक आणि दुसऱ्यांना चोर, देशद्रोही मानत आहे. ही मानसिकता योग्य नाही. राष्ट्रवादाच्या नावावर देशद्रोह कायद्याचा चुकीचा वापर होऊ नये. काँग्रेस पक्ष देशद्रोह कायद्यासंदर्भात अधिक स्पष्टता आणू इच्छिते, कायदा बदलवण्याचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तुष्टीकरण नाही, शिक्षणावर भरकाँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करीत नाही. पक्षाने जीडीपीच्या सहा टक्के रक्कम शिक्षणासाठी राखीव ठेवली आहे. पहिली ते दहावी पर्यंत मोफत शिक्षण, नरेगा, फूड सेफ्टी अ‍ॅक्ट हे सर्व काही कोणत्याही एका वर्गासाठी नाही. या योजना सर्वांसाठीच आहे. याउलट मोदी सरकारने सिंचन, सामाजिक न्याय व संरक्षण क्षेत्राच्या बजेटमध्ये मोठी कपात केली आहे. काँग्रेसने आणलेल्या योजनांची नावे बदलून त्या आपल्या योजना असल्याचे सांगणे सुरू आहे, अशी टीका खरगे यांनी केली.

‘प्रेस’च्या स्वातंत्र्याची गरजखरगे म्हणाले, मीडियाचे ‘कॉर्पोरेटाइजेशन’ करण्यात आले आहे. या क्षेत्रात एकाधिकार व पुंजीवाद फोफावत आहे. हे सर्व थांबवून प्रेसचे स्वातंत्र्य अबाधित राखणे आवश्यक आहे. यासाठीच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात नवी मीडिया पॉलिसी बनविण्यावर भर दिला आहे. याद्वारे ‘मीडिया’मध्ये क्रॉस होल्डिंग आॅफ मीडियाला रोखले आहे.

महाराष्ट्रात आघाडी पहिल्या क्रमांकावरलोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची कामगिरी कशी राहील याबाबत खरगे म्हणाले, २०१४ नंतर नोटबंदी, जीएसटी आणि बेरोजगारीने लोक त्रासले आहे. विदर्भात शेतकरी त्रासले आहेत. केंद्र आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार असूनही समस्या सुटलेली नाही. मोदी सरकारने २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. यामुळे लोक पुन्हा काँग्रेसकडे वळत आहेत. काँग्रेस पक्ष निवडणुकीमध्ये पूर्ण परिश्रम घेत आहे. याचे चांगले परिणाम दिसून येतील. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पक्षाच्या जागा वाढतील आणि आणि काँग्रेस-राकाँ आघाडी पहिल्या क्रमांकावर राहील, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019