शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

यकृताचे रुग्ण अडचणीत

By admin | Updated: May 8, 2017 02:31 IST

किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवीत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असते

मेडिकल : उपकरण बंद पडल्याने चाचण्या ठप्प लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवीत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असते, म्हणूनच डॉक्टर काहीसंशयित रुग्णांना ‘लिव्हर फंक्शनिंग टेस्ट’ (एलएफटी) करायला लावतात. तर यकृताच्या (लिव्हर) गंभीर रुग्णांसाठी ही चाचणी महत्त्वाची ठरते. मेडिकलमध्ये यासाठी ‘सिमेन्स आॅटोअ‍ॅनलाझर’ उपकरण घेण्यात आले, परंतु पाच दिवसांपासून हे उपकरणच बंद पडल्याने चाचण्या थांबल्या असून गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. मेडिकलमध्ये पूर्वी बाह्यरुग्ण विभागात साधारण १५०० वर रुग्ण यायचे. आता ती वाढून २५०० वर गेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत येथे उपलब्ध सोयी कमी पडत आहेत. तर दुसरीकडे आजाराचे निदान करणारे उपकरण बंद पडत असल्याने विशेषत: गरीब रुग्णांना बाहेरून पदरमोड करून चाचण्या कराव्या लागत आहे. जीवरसायनशास्त्र विभागातील चिकित्सालयीन प्रयोगशाळेतील ‘सिमेन्स आॅटोअ‍ॅनलायझर’ उपकरण गुरुवारपासून अचानक बंद पडले. यामुळे या उपकरणांवर रोज होणाऱ्या चाचण्यांना फटका बसला आहे. विशेषत: ‘एलएफटी’ ही महत्त्वाची चाचणी बंद झाल्याने यकृताचा (लिव्हर) आजार असलेल्या रुग्णांना बाहेरून तपासणी करावी लागत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विभागाने इतर विभागांना उपकरण बंद पडल्याची माहिती देऊन चाचण्यांकरिता रक्त नमुने पाठविण्यात येऊ नये, असे लेखी पत्र दिले आहे. यात आकस्मिक चाचण्या नेहमीप्रमाणे सुरू राहील, असेही म्हटले आहे. परंतु आकस्मिक चाचण्याही होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरानुसार, यकृताचा आजार घेऊन रोज तीन-चार रुग्ण मेडिकलमध्ये येतात. काही गंभीर रुग्ण अतिदक्षता विभाग उपचारालाही आहेत. परंतु यकृताशी संबंधित चाचणी बंद पडल्याने या रुग्णांना खासगी पॅथालॉजी लॅबमधून चाचणी करण्यास सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, मेडिकलचे उपकरण बंद पडताच काही खासगी लॅबचे शुल्क अचानक वाढत असल्याने याचा फटका गरीब रुग्णांना बसत आहे.