शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यावरून आले यकृत, रुग्णाचा वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST

नागपूर : छत्तीसगड दुर्ग येथील रहिवासी असलेला २१ वर्षीय युवकाचा गोव्यात अपघात झाला. कुटुंबीयांनी त्या दु:खातही स्वत:ला सावरत अवयव ...

नागपूर : छत्तीसगड दुर्ग येथील रहिवासी असलेला २१ वर्षीय युवकाचा गोव्यात अपघात झाला. कुटुंबीयांनी त्या दु:खातही स्वत:ला सावरत अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती,‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’(झेडटीसीसी), नागपूरला देण्यात आली. ‘रिजनल ऑर्गन अ‍ॅण्ड टिशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’च्या (रोटो) नियमानुसार त्या दात्याचे यकृत गोवा येथून विशेष विमानाने नागपुरात आणले. न्यू ईरा हॉस्पिटलमधील एका ५८ वर्षीय पुरुषावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आल्याने रुग्णाला जीवनदान मिळाले. विशेष म्हणजे, कोरोनाच्या आठ महिन्यानंतर पहिल्यांदाच कॅडेव्हर म्हणजे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान झाले.

झेडटीसीसीने दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञुम्न नावाच्या युवकाचा गोवा येथे १ डिसेंबर रोजी अपघात झाला. त्याला तातडीने गोवा मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ झाल्याची घोषणा केली. रुग्णालयाच्या डॉ. प्रीती वर्गिस यांनी नातेवाईकांना अवयवदान करण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही मूत्रपिंड, यकृत, हृदय व फुफ्फुस दान करण्यात आले. त्यापूर्वी याची माहिती, ‘सोटो’-‘रोटो’च्या नियमानुसार झेडटीसीसी, नागपूरच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन कॉर्डिनेटर वीणा वाठोडे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. दात्याच्या रक्तगटाशी मिळत्याजुळत्या रुग्णाचा शोध घेण्यात आला. हा रुग्ण न्यू ईरामध्ये भरती होता. रुग्णाला यकृताची गरज होती. ते नियमातही बसत होते. यामुळे विशेष विमानाने यकृत मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर पोहचले. तेथून ४ मिनिटात ग्रीन कॉरिडोअरने हॉस्पिटलमध्ये पोहचून पुढील तीन तासात प्रत्यारोपण करण्यात आले.

नागपुरात ३७ वे यकृत प्रत्यारोपण

नागपुरात आतापर्यंत ३७ यकृतांचे प्रत्यारोपण झाले. यातील २८ यकृत प्रत्यारोपण न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये झाले. आज झालेल्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. साहिल बन्सल व डॉ. स्नेहा खडे आणि त्यांच्या चमूने यशस्वी केली.

नागपूरबाहेरून आले चार अवयव

आतापर्यंत नागपूरबाहेरून चार अवयव आले. २०१८ मध्ये औरंगाबाद येथून दोनवेळा यकृत नागपुरात आणण्यात आले. यासाठी औरंगाबाद ते नागपूर मार्ग हा ग्रीन कॉरिडोअर करण्यात आला होता. २०१९ मध्ये पुण्यावरून विशेष विमानाने हृदय नागपुरात आणले होते. आज चौथ्यांदा गोव्यावरून यकृत नागपुरात आणले.