शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी महापौरांची लेटलतिफांना तंबी

By admin | Updated: June 1, 2017 02:46 IST

महापौर नंदा जिचकार यांनी गेल्या महिन्यात केलेल्या आकस्मिक पाहणीत बरेच कर्मचारी विलंबाने कार्यालयात

वेळेत हजर रहा : अन्यथा कारवाई करणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापौर नंदा जिचकार यांनी गेल्या महिन्यात केलेल्या आकस्मिक पाहणीत बरेच कर्मचारी विलंबाने कार्यालयात येत असल्याचे उघडकीस आले होते. महापौरांच्या या पाहणीनंतर कर्मचाऱ्यांवर वचक बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झालेले नाही. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी मंगळवारी केलेल्या आकस्मिक पाहणीत बरेच कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. आता पार्डीकर यांनी लेटलतिफांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. महापौर नंदा जिचकार या बाहेरगावी गेल्या आहेत. त्यामुळे पार्डीकर यांच्याकडे महापौरपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. महापालिकेच्या सर्व झोन कार्यालयाच्या वेळा बदलविण्यात आलेल्या आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातील सर्व झोनचे कामकाज आज मंगळवारपासून सुरू होणार होते. त्या पार्श्वभूमीवर प्रभारी महापौर पार्डीकर यांनी मंगळवारी नेहरूनगर झोन व लकडगंज झोनमध्ये पाहणी केली. नेहरूनगर झोनमध्ये ७० पैकी फक्त १० कर्मचारी उपस्थित होते. यावर पार्डीकर यांनी नाराजी व्यक्त केली. विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. उद्यापासून वेळेत हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी दिली. लकडगंज झोनमध्येही तीच परिस्थिती दिसून आली. नेहरूनगर व लकडगंज झोनमधील बायोमेट्रिक मशीन्समध्ये बिघाड असल्याने ती त्वरित दुरुस्त करावी. कर्मचाऱ्यांनी वेळेत येऊन नागरिकांच्या सर्व समस्या सोडव्यावात, नागरिकांची कुठलीही तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पार्डीकर यांनी यावेळी दिला. यानंतर पार्डीकर यांनी दोन्ही झोनच्या विविध विभागांची पाहणी केली व व्यवस्थेचा आढावा घेतला. झोनमध्ये असलेल्या समस्या जाणून घेतल्या व त्याची पूर्तता लवकरात लवकर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या पाहणीदरम्यान लकडगंज झोनचे अतिरिक्त सहायक अधीक्षक राजेंद्र बावनकर, राजेंद्र गोतमारे उपस्थित होते.