शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या इतिहासप्रकरणी केंद्राला पाठविणार पत्र

By admin | Updated: December 20, 2014 02:35 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्याच इतिहासाची ‘एनसीईआरटी’तर्फे (नॅशनल कौन्सिल आॅफ एज्युकेशन रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग) अवहेलना करण्यात येत असल्याच्या...

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्याच इतिहासाची ‘एनसीईआरटी’तर्फे (नॅशनल कौन्सिल आॅफ एज्युकेशन रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग) अवहेलना करण्यात येत असल्याच्या प्रकाराची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची माहिती अवघ्या पाच ओळीत दिल्याच्या मुद्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून यात बदल करण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते.इयत्ता सातवीच्या ‘हमारे अतित-२’ या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची माहिती अवघ्या पाच ओळीत दिली आहे. पुस्तकात नगण्य स्थान दिल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत महाराजांच्या पराक्रमाचा गौरवशाली इतिहास योग्य तऱ्हेने पोहचत नसल्याचे चित्र आहे. राज्य शासन याबाबत पुढाकार घेऊन केंद्र व ‘एनसीईआरटी’ला इतिहासात बदल करायला भाग पाडणार का, असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. यासंदर्भात हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तावडे यांची भेट घेतली. यासंदर्भात मुंबईला एक बैठक बोलवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी समितीच्या शिष्टमंडळामध्ये भाजपचे कल्याणचे आमदार श्री. नरेंद्र पवार, हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर उपस्थित होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण शिकवण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)