शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण कारवाईत लाठीमार

By admin | Updated: February 5, 2016 02:40 IST

शहरातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी महापालिका व नासुप्रच्या पथकाकडून कारवाई केली जाते.

जरीपटका भागात तणाव : व्यापाऱ्यांकडून विरोध नागपूर : शहरातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी महापालिका व नासुप्रच्या पथकाकडून कारवाई केली जाते. परंतु जरीपटका व खामला येथे कारवाई करताना पथकाला विरोधाला सामोरे जावे लागले. जरीपटका येथील बाजारभागात महापालिकेच्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला गुरुवारी व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यामुळे काहीवेळ या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच खामला येथे बुधवारी एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास जरीपटका, पाचपावली व मानकापूर पोलीस स्टेशनचा प्रचंड पोलीस बंदोबस्त, सोबतच राखीव पोलीस दलाच्या जवानांसह जरीपटका येथे पोहचले. मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्या नेतृत्वात कारवाईला सुरुवात करण्यात आली. परंतु फुटपाथवर केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करताच व्यापाऱ्यांनी याला विरोध दर्शविला. माजी नगरसेवकांनी या कारवाईला विरोध दर्शविला. सोबतच व्यापारी व नागरिक विरोध करू लागले. यामुळे येथे मोठा जमाव झाला होता. परंतु प्रचंड पोलिस बंदोबस्त असल्याने त्यांचा विरोध मावळला. अतिक्रमण करणाऱ्या १५ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. दरम्यान महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून अतिक्रमण काढण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली. पुढील कारवाई स्थगित करण्यात आली. त्यानंतर दयानंद पार्क येथील अतिक्रमण हटविण्यात आले. ही कारवाई अभियंता एस.वी. बागडे, भास्कर माळवे, मंजू शाह, जमशेट अली, शरद इरपाते, वानखेडे आदींच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)