शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाचा लेटलतिफपणा ; अद्यापी ‘राव’च राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:13 IST

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी झाला असताना नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मात्र अद्यापही चे. विद्यासागर राव हेच राज्यपाल असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसंकेतस्थळावर अद्यापही बदल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लेटलतिफपणा अद्यापही कायमच आहे. आता तर चक्क विद्यापीठाच्या कुलपतींसंदर्भातच विद्यापीठाने हलगर्जीपणा दाखविला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी झाला असताना संकेतस्थळावर मात्र अद्यापही चे. विद्यासागर राव हेच राज्यपाल असल्याचे दिसून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संकेतस्थळासंदर्भात वारंवार गंभीर चुका होत असतानादेखील प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही.राज्याचे राज्यपाल हेच विद्यापीठाचे कुलपती असतात. चे. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ ३ सप्टेंबर रोजीच पूर्ण झाला व त्यांना निरोपदेखील देण्यात आला. तर ५ सप्टेंबर रोजी भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची शपथ घेतली. त्यानंतर सहा दिवस उलटून गेल्यानंतरदेखील विद्यापीठ प्रशासनाला जाग आलेली नाही. अद्यापही विद्यासागर राव यांचेच नाव कुलपती म्हणून मुख्य पृष्ठावरच दिसून येत आहे. ‘लोकमत’ने याअगोदर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील विविध त्रुटी समोर आणल्या आहेत. यात विद्यापीठाकडून उशिराने सुधारणा करण्यात आली. मात्र वारंवार असे प्रकार दिसून येत आहेत. यासंदर्भातील अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

खटी अद्यापही परीक्षा व मूल्यमापन संचालकसंकेतस्थळावर अनेक चुका अद्यापही कायम आहे. डॉ. नीरज खटी यांनी परीक्षा व मूल्यमापन संचालकपदाचा राजीनामा देऊन अनेक महिने झाले. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. अनिल हिरेखण यांच्याकडे या विभागाची जबाबदारी आहे. संकेतस्थळावर मात्र अद्यापही डॉ. नीरज खटी हेच परीक्षा व मूल्यमापन संचालक असल्याचे दाखविण्यात येत आहे. 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ