शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हक्कभंग प्रस्ताव आणणार

By admin | Updated: March 21, 2016 02:47 IST

राज्य सरकारने आॅक्टोबर २०१५ मध्ये राज्यातील १४,७०८ गावांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली होती. यातून

नागपूर : राज्य सरकारने आॅक्टोबर २०१५ मध्ये राज्यातील १४,७०८ गावांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली होती. यातून विदर्भाच्या नागपूर विभागातील ७६०० तर अमरावती विभागातील ४७२७ गावांची पैसेवारी ५०टक्केपेक्षा कमी असून वगळण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात गंभीर नसल्याने आज सोमवारी विरोधी पक्षातर्फे विधिमंडळात हक्कभंग, स्थगन प्रस्ताव आणणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी परिस्थितीबाबतच्या अहवालात शेतकऱ्यांविषयी अनास्था असल्याने स्पष्ट झाले आहे. ५० टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. देवानंद पवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अमरावती विभागातील ४७२७ गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश दिले. याप्रमाणे पूर्व विदर्भातील ७६०० गावांचाही यादीत समावेश व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या वर्षभरात राज्यातील तीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कोणत्याही स्वरूपाच्या ठोस उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत. उलट ५० टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांचा यादीत समावेश न करता सरकारने ७५ टक्केपेक्षा कमी पाऊ स असलेल्या गावांचा समावेश करण्याचा अफलातून निर्णय घेतला. भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाहीएमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी भारत मात की जय म्हटले नाही. म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले. या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी सभागृहातील परिस्थितीनुरूप निर्णय घेतला असेल. मात्र आम्हाला योग्य वाटत असेल तेच इतरांनी बोलावे. ही त्यांची भूमिका चुकीची आहे. देशभक्तीसाठी भाजप-शिवसेनेच्या प्रमाणपत्राची कुणाला गरज नसल्याचे चव्हाण यांनी प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.उर्दू साहित्यिक देशद्रोही कसे?केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शासनाचे अनुदान घेणाऱ्या उर्दू साहित्यिकांना सरकार विरोधात लिखाण करता येणार नाही, असा संदर्भात फतवा काढला आहे. एखाद्या साहित्यिकाने सरकार विरोधात लिखाण केले म्हणजे तो देशद्रोही आहे का, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे. देशातील सर्वच उर्दू साहित्यिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.