शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक प्रणालीने गुन्हेगारांवर अंकुश

By admin | Updated: June 27, 2015 03:19 IST

गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

नागपूर : गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्याचसोबत उपराजधानीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी एमपीडीए, मोक्कासारखी कठोर कारवाई करण्याचेही तंत्र पोलिसांनी अंगिकारले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या उपायुक्त आणि शहर पोलीस दलाच्या ‘प्रवक्ता’ दीपाली मासिरकर यांनी दिली. शुक्रवारी दुपारी त्यांनी ‘गुन्हेगारी आणि पोलीस’ यासंबंधाने पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.हत्या, हत्येचे प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, जबरी चोऱ्या, हाणामाऱ्या, लुटमार, घरफोडी आदी घटनांमध्ये सारखी वाढ होत असून, प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती मिळत नसल्यामुळे उलटसुलट बातम्या छापून येतात. दुसरीकडे अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावूनही पत्रकारांपर्यंत त्याची माहितीच पोहचत नाही. त्यामुळे पोलीस हातावर हात बांधून बसल्यासारखे सामान्यांना वाटते. या पार्श्वभूमीवर, मुंबई, दिल्लीच्या धर्तीवर प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती देण्यासाठी तसेच पोलीस, नागरिक आणि पत्रकार यांच्यामधील संवाद सुरळीत व्हावा या हेतूने पोलीस आयुक्तांनी डीसीपी दीपाली मासिरकर यांची प्रवक्ता म्हणूननियुक्ती केली आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी दुपारी मासिरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी आक्रमक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळेच मागच्या वर्षभरात ११ गुन्हेगारांवर एमपीडीए लावण्यात आला होता. यावर्षीच्या सहाच महिन्यात डझनभर गुन्हेगारांवर एमपीडीए लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ५० गुन्हेगारांवर मोक्का लावण्याची योजना असून, त्यात इमामवाड्यातील सामूहिक बलात्कारातील आरोपींचाही समावेश असल्याचे त्या म्हणाल्या. गुन्हा घडल्यानंतर माहिती देऊनही गस्तीवरील पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचत नाहीत. त्याची अनेक उदाहरणे पत्रकारांनी सांगितली. ती मान्य करीत, पोलिसांच्या सर्व वाहनांना ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) लावली जाईल. त्यामुळे गुन्हा कुठे घडला आणि पोलिसांचे वाहन कुठे आहे ते ‘कंट्रोल रूम’मध्ये दिसेल. त्यातून तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचतील. हयगय करणाऱ्यांवर लगेच कारवाई केली जाईल. हैराण करणाऱ्या चेनस्नॅचर्सचा शोध घेण्यासाठी सायंटिफिक पद्धत अवलंबली जाणार असून, त्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.गुन्हेगारांशी याराना असलेली मंडळी पोलीस दलात आहे, याकडे लक्ष वेधले असता ठोस माहिती मिळाल्यास अशा पोलिसांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे मासिरकर म्हणाल्या. (प्रतिनिधी)