शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची ‘जनपद’ची जमीन हडपली

By admin | Updated: March 19, 2016 02:33 IST

स्वातंत्र्यापूर्वीच्या तारखेच्या नोंदीसह एकाने ‘ डिजिटल’ अधिकार अभिलेख तयार करून कोट्यवधीची ‘जनपद’ ची जमीन स्वत:च्या

राहुल अवसरे ल्ल नागपूरस्वातंत्र्यापूर्वीच्या तारखेच्या नोंदीसह एकाने ‘ डिजिटल’ अधिकार अभिलेख तयार करून कोट्यवधीची ‘जनपद’ ची जमीन स्वत:च्या नावे केली. स्वातंत्र्यापूर्वी आधुनिक संगणक प्रणाली अस्तित्वात होती काय, असा प्रश्न उपस्थित करून या दस्तऐवजाने शासकीय यंत्रणेत खळबळ उडवून दिली आहे. मौजा अजनी (खुर्द ) येथील या जमिनीचा खसरा क्रमांक ४७/३, असा नमूद करण्यात आला आहे. जमिनीचे क्षेत्रफळ ०.१० एच.आर. असे नमूद आहे. जमीन ताब्यातील कुळधारकाचा उल्लेख गोपाळराव गंगाधर गाडगे , असा करण्यात आला आहे. ‘तीन रुपये आठ आणे’ एवढ्या किमतीच्या स्टॅम्प पेपरवर ३६१ (रोमन लिपीत ११) -९/४३-४४ असा क्रमांक नमूद करून डेप्युटी कमिश्नर, नागपूर यांच्या सही व शिक्क्यानिशी अधिकार अभिलेख तयार करण्यात आलेला आहे. अर्धा चौरस कि. मी. क्षेत्रफळ असलेली ही जमीन आताच्या साई मंदिराच्या मागच्या भागातील आहे. मूळ जमीन ‘जनपद’ ची अर्थात आताच्या नागपूर जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. सध्या या जमिनीची किंमत २२ ते २५ कोटी रुपये आहे, ही माहिती जिल्हा परिषदेचे वकील अ‍ॅड. मनोज साबळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. कधी गोपाळराव गंगाधर गाडगे तर कधी गंगाधर गोपाळराव गाडगे, अशा काल्पनिक नावांचा वापर करून त्यांना कागदोपत्री ताबेदार कुळधारक दाखविल्यानंतर नरेश ठाकरे नावाच्या एका व्यक्तीने ही जमीन स्वत:च्या नावे केली आहे.