रेवराल : शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत पिपपरी (ता. माैदा) येथील मधुकर िकरपान आणि खंडाळा (ता. माैदा) येथील अंकुश भाकरे यांच्या शेतात जमीन आरोग्यपत्रिका प्रशिक्षण कार्यक्रमाचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. यात शेतकऱ्यांना शेतजमिनीची निगा कशी राखायची, याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य स्वप्नील श्रावणकर, सरपंच देवानंद चव्हाण, उपसरपंच चक्रधर गभणे, कृषी अधिकारी संदीप नाकाडे, मंडळ कृषी अधिकारी नेहा इमानदार, कृषी सहायक धर्मराज सातपुते, बीएएसएफचे विभागीय व्यवस्थापक विनोद जयस्वाल उपस्थित हाेते. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना विविध पिकांना आवश्यक असलेले अन्नद्रव्य, जमिनीतून मिळणारे व वरखतांमधून मिळणारे अन्नद्रव्य, अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे परिणाम, बीजप्रक्रिया, खालावत चाललेला जमिनीचा पाेत, त्यातून पिकांचे घटणारे उत्पादन, मिरचीवरील बाेकड्या राेग, धानावरील तुडतुड्यांचा प्रादुर्भाव, या किडींची नियंत्रणासाठी घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययाेजना यासह अन्य महत्त्वाच्या बाबींची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या त्यांच्या विविध समस्यांचे निरसनही करण्यात आले. कार्यक्रमाला कृषी सहायकद्वय संदीप देशमुख, कृषी सहायक श्वेतलाना कदम, ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान किरपान, रमेश बरबटे, श्रीकांत किरपान, अंकुश भाकरे, प्रमोद डेंगे, आनंदराव बोबडे, श्याम मानकर, मधुकर किरपान, शंकर पटिये, गोपाल उघडे, सेवक भाकरे, चंद्रशेखर कोंगे, देविदास किरपान, भोजराज किरपान, कैलास लिचडे, चंदन पटिये, खुशाल कोंगे यांच्यासह स्थानिक व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.