शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या आनंदाश्रमासाठी जमीन दान

By admin | Updated: October 29, 2015 03:24 IST

आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळाची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा २५ रोजी वासवी कल्याणमंडपम्, रामनगर येथे पार पडली.

नागपूर : आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळाची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा २५ रोजी वासवी कल्याणमंडपम्, रामनगर येथे पार पडली. अध्यक्षस्थानी वेकोलिचे निवृत्त संचालक द.रा. मामीडवार तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल इंडियाचे निवृत्त आर्थिक संचालक अरविंद कोमावार होेते. महाराष्ट्र आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष गणेश चक्करवार हे विशेष आमंत्रित होते. मंडळाने हाती घेतलेला ‘ज्येष्ठांसाठी आनंदाश्रम’ हा प्रकल्प या आमसभेचे प्रमुख आकर्षण होते. या प्रकल्पासाठी व्यंकटेश ऊर्फ राजू कुणावार यांनी आपल्या टाकळघाट येथील ले-आऊटमधील सर्व सोयींनीयुक्त अशी २६ हजार चौरस फूट जागा दान केली. या जागेची बाजारभाव किंमत एक कोटी रुपये आहे. जागेचे कागदपत्र आणि दानपत्र त्यांनी मंडळाच्या हवाली केले. मंडळातर्फे राजू कुणावर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष द.रा. मामीडवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाजातर्फे राजू कुणावार यांच्या दानशूर वृत्तीबद्दल कौतुकांचा वर्षाव होत आहे. प्रकल्पाचे आर्किटेक्ट अंबरीश गोलावार यांनी प्रस्तावित आनंदाश्रमाच्या स्वरूपाबद्दल प्रोजेक्टरद्वारे सविस्तर माहिती दिली. त्यांचाही मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. प्रा. भाऊराव बिरेवार यांनी लेखानाच्या क्षेत्रात, गजानन कोटावर यांनी सामाजिक क्षेत्रात, रेखाताई गंधेवार यांनी काव्य लेखनाच्या क्षेत्रात केलेल्या विशेष कामगिरीसाठी त्यांचाही सत्कार करण्यात आला. समाजातील ८० वर्षांवरील ज्येष्ठांचासुद्धा सभेत सत्कार करण्यात आला.ज्येष्ठांनी नेत्रदान करवे आणि आपले इच्छापत्र लिहून ठेवावे, यावर भर देण्यात आला. मंगलगीत व पसायदान वासंती गुंडावार यांनी गायिले. संचालन मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद भास्करवार यांनी केले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेश तन्नीरवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.(वा. प्र.)