शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-नेपाळमध्ये विश्वासाची कमतरता

By admin | Updated: June 10, 2017 03:03 IST

भारत आणि नेपाळ या दोन्ही देशात प्राचीन काळापासून संबंध आहेत. दोन्ही राष्ट्रातील नागरिकांमध्ये सामंजस्य आहे.

जनरल रुकमांगद कटवाल : ‘वर्तमान परिस्थितीत भारत-नेपाळचे संबंध व भविष्य’ विषयावर व्याख्यान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारत आणि नेपाळ या दोन्ही देशात प्राचीन काळापासून संबंध आहेत. दोन्ही राष्ट्रातील नागरिकांमध्ये सामंजस्य आहे. नेपाळसाठी भारत नेहमीच मोठ्या भावासारखा राहिला आहे, असे असले तरी दोन्ही देशांमधील संबंधात विश्वासाची कमतरता आहे, अशी जाहीर कबुली नेपाळचे रिटायर्ड चीफ आॅफ आर्मी स्टाफ जनरल रुकमांगद कटवाल यांनी येथे दिली. भारतीय विचार मंचतर्फे ‘वर्तमान परिस्थितीत भारत-नेपाळचे संबंध व भविष्य’ या विषयावर चिटणवीस सेंटर येथे परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावर आपले विचार व्यक्त करताना ते बोलत होते. जनरल कटवाल म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि भारत हे शेजारी आहेत. त्यामुळे नेपाळ हा देश स्थिर राहणे हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भारत-नेपाळचे संबंध अतिशय जुने असले तरी त्यात मागील काही वर्षांपासून दोन्ही देशात विश्वासाची कमतरता आहे. यासाठी नेपाळमधील राजकीय परिस्थितीसुद्धा कारणीभूत आहे. कारण नेपाळमध्ये राजकीय वातावरण फारसे स्थिर राहिलेले नाही. त्यामुळे चर्चा करायची तरी कुणाशी असा पेच भारतासमोर राहत असतो. नेपाळ सध्या धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून लोकशाहीदृष्ट्या ते विकसित होत आहे. ते चांगले विकसित व्हावे, आणि राजकीयदृष्ट्या स्थिर राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरेही दिली. उमेश अंधारे यांनी भूमिका विषद केली. नेपाळ हिंदू राष्ट्र नको, मूठभर नेत्यांचा निर्णय नेपाळची हिंदू राष्ट्राची ओळख मिटवून एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र करावे, असा निर्णय नेपाळमधील काही मूठभर नेत्यांनी बसून घेतला, अशी मागणी कुणीही केली नव्हती. तसेच नागरिकांमधूनही अशी मागणी नव्हती. हा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचे फायदे अजूनतरी दिसून आलेले नाहीत, असेही जनरल रुकमांगद कटवाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.