शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरचा तुटवडा, ग्राहक गॅसवर

By admin | Updated: September 5, 2014 01:11 IST

सार्वजनिक भोजनांच्या कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या गौरी-गणपती उत्सवाच्या काळात नेमका घरगुती सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने, नागरिकांना चढ्या दराने सिलिंडर खरेदीची वेळ आली आहे.

एजन्सीपुढे रांगा : सिलिंडर हजारावर!नागपूर : सार्वजनिक भोजनांच्या कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या गौरी-गणपती उत्सवाच्या काळात नेमका घरगुती सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने, नागरिकांना चढ्या दराने सिलिंडर खरेदीची वेळ आली आहे. काळ्याबाजारात सिलिंडरच्या किमतीत हजारावर पोहोचल्याने महागाईची खरी झळ आता बसत असल्याची नागरिकांची ओरड आहे. सर्वच कंपन्यांच्या एजन्सीपुढे ग्राहकांच्या रांगा असून अधिकाऱ्यांनी नेहमीचे कारण पुढे करून ग्राहकांना वाऱ्यावर सोडून एजन्सीची बाजू मांडत आहे. ‘बुरे दिन की शुरुवात’ अशी नागरिकांची ओरड आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता वर्धमाननगर येथील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या एजन्सीसमोर १०० पेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होती. यासंदर्भात प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी ग्राहकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)सिलिंडरचा अपुरा पुरवठाकंपनीच्या तांत्रिक अडचणीशी ग्राहकांना काही घेणे-देणे नाही. सिलिंडर सुरळीत मिळणे, हा नागरिकांचा हक्क आहे. आमचा हक्क सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि एजन्सी हिरावून नेत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. ‘गाडी आली नाही’ असे सांगून सिलिंडर नाकारले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून महिलावर्ग वैतागला आहे. ओळखी काढून सिलिंडर मिळावे म्हणून ग्राहकांचा आटापिटा सुरू आहे. गॅस एजन्सींनी आपले मनमानी धोरण राबवून ग्राहकांची अडवणूक सुरू केली असून त्याला नियंत्रण बसायला हवे, असे मत काही ग्राहकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. भारत, एचपी व इण्डेन गॅस कंपन्यांकडे हजारो सिलिंडरची बुकिंग पेंडिंग आहेत. पुरेसा लोड (एक ट्रक ३०६ सिलिंडर) येत असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे एजन्सी चालकांनी सांगितले. लोकांच्या अडचणीची दखल एजन्सीकडूनही घेतली जात नसल्यामुळे अनेक कुटुंबांना त्याची झळ बसली आहे. दुसरीकडे अनेक टपरीचालक, चहाची दुकाने, कॅन्टीन, उपाहारगृह आणि हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरचा उघड वापर केला जात आहे. टंचाई कधी दूर होणार?तांत्रिक कारणांमुळे घरगुती सिलिंडरची टंचाई आहे, यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब करताना टंचाई लवकरच दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. बल्कचा पुरवठा कमी असल्याने सिलिंडरचे रिफिलिंग होत नाही. वितरकांकडे लोड उपलब्ध होत आहेत, पण मागणी वाढल्याने टंचाई जाणवत आहे. स्थिती सामान्य करण्याचे वरिष्ठस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे अधिकारी म्हणाले.