शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

विडीसाठी मजुराचा खून

By admin | Updated: October 29, 2015 03:28 IST

कळमना येथील एका मजुराचा केवळ विडी दिली नाही म्हणून खून करण्यात आला.

दोन आरोपी अटकेत : कळमना हत्याकांड उघडकीसनागपूर : कळमना येथील एका मजुराचा केवळ विडी दिली नाही म्हणून खून करण्यात आला. कळमना पोलिसांनी मृताची ओळख पटविली असून दोन आरोपींना अटक केली आहे. रामचंद्र रामाजी बागडे (५४) असे मृताचे नाव आहे. नागेश ऊर्फ नाग्या प्रीतम बोरकर (२०) आणि प्रवीण ऊर्फ पऱ्या तानोबा पाटील (२४) असे आरोपीचे नाव आहे.तिघेही भांडेवाडी येथील रहिवासी आहेत. मंगळवारी सकाळी कळमना येथील नागेश्वरनगर येथे मृतदेह आढळून आला. सुरुवातीला मृतदेह एखाद्या तरुणाचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तपासादरम्यान पोलिसांना रेल्वे रुळाजवळ सोमवारी रात्री काही लोकांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी नागेश्वरनगरातील रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला तपास सुरू केला. त्यांना भांडेवाडी येथे एका ठिकाणी रुळाच्या काठावर खून पडल्याचे दिसून आले. पोलीस तपास करीत बागडे यांच्या घरी पोहोचले. त्याच्या पत्नीने सोमवारी रात्रीपासून तो घरी आला नसल्याचे सांगितले. सोमवारी रात्री पती आरोपीसोबत गेल्याचेही सांगितले. कळमना पोलिसांनी बुधवारी सायंकाळी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री तिघेही भांडेवाडी येथील रेल्वे रुळाच्या बाजूला दारु प्यायले. त्यानंतर प्रवीणने बागडेला विडीसाठी पैसे मागितले. बागडेने नकार दिला. त्यामुळे प्रवीण त्याला शिव्या देऊ लागला. बागडेने त्याला थापड मारली. दरम्यान नागेशने चाकू काढून त्याच्यावर वार केला व जखमी केले. बागडे ओळखीचा असल्याने पकडले जाण्याची भीती नागेशला होती. त्यामुळे त्याने आणखी वार करून त्याचा खून केला. खून केल्यावर दोघेही घरी आले. पुन्हा दोघांनी दारू घेतली. घरून सायकल व ब्लँकेट घेऊन पुन्हा घटनास्थळी गेले. मृतदेह ब्लँकेटने लपेटून सायकलवर ठेवला. बागडेचा मृतदेह सायकलवर तीन किलोमीटरपर्यंत आणला. तिथे रुळाच्या काठावर मृतदेह फेकून दिला. नागेश्वरनगर येथून दोघेही पारडीच्या पेट्रोल पंपावर आले. येथून ५ लिटर डिझेल खरेदी केले. मृतदेहावर डिझेल टाकून आग लावली. मंगळवारी मृतदेहाची ओळख न पटल्याने आरोपी निश्चिंत झाले. बागडे आणि आरोपी दोघेही मजुरी करीत होते. ही कारवाई डीसीपी अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील बोंडे, एपीआय धर्मेंद्र आवारे, हवालदार अरविंद मोहोड, संतोष ठाकूर, संतोष उईके, कृष्णा इवनाते, नितीन क्षीरसागर, राजू जाधव आदींनी केली. (प्रतिनिधी)