शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशाळा बनली औषध भांडार

By admin | Updated: May 3, 2017 02:39 IST

महापालिकेचे इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल हे गॅस्ट्रोच्या रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाचे हॉस्पिटल आहे.

आयसोलेशनची व्यथा : महापौर असताना देवेंद्र फडणवीस यांनी केले होते उद्घाटन गणेश हूड/आनंद डेकाटे  नागपूर महापालिकेचे इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल हे गॅस्ट्रोच्या रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाचे हॉस्पिटल आहे. मात्र इतर रुग्णालयाप्रमाणे या हॉस्पिटलचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापौर असताना त्यांच्या हस्ते या रुग्णालयातील प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले होते. काही दिवस ही प्रयोगशाळा सुरू होती. नंतर बंद पडली ती कायमचीच. प्रयोगशाळेची दुमजली इमारत आहे. परंतु तळमजला रिकामा असून वापरात नाही. वरच्या मजल्याचा वापर औषधे ठेवण्यासाठी के ला जातो. शहरातील दूषित पाण्याचे नमुने तपासण्याची सुविधा व्हावी. या हेतूने २६ जून १९९८ रोजी या प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु ही प्रयोगशाळा काही महिन्यात बंद पडली. ती पुन्हा सुरळीत सुरू व्हावी. यासाठी प्रयत्न झाले नाही. आयोसोलेशन हॉस्पिटलमधील प्रयोग शाळा सुरू असती तर रुग्णांवर उपचार करणे अधिक सोयीचे झाले असते. आयसोलेशन दवाखान्यामध्ये दूषित पाणी व शिळे अन्न खाल्ल्याने उद्भवणाऱ्या गॅस्ट्रोच्या रु ग्णांवर उपचार केले जातात. शहरात गॅस्ट्रोच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे एकमेव हॉस्पिटल आहे. शहरातील जुन्या हॉस्पिटलपैकी ते एक आहे. एकेकाळी हे हॉस्पिटल रुग्णामुळे गजबजलेले असायचे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या या हॉस्पिटलमध्ये पुरुष व महिला असे दोन स्वतंत्र वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात २० बेड आहेत.परंतु सुविधांचा अभाव आहे. गेल्या काही दिवसापूर्वी येथील कुलर सुरू करण्यात आले आहे. अन्यथा रुग्णांना उन्हाळ्यातही पंख्याची हवा घ्यावी लागत होती.