शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

कोविड हॉस्पिटलला दररोज मिळताहेत ८,६२२ जम्बो सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:08 IST

नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नागपुरातील खासगी व व्यावसायिक कंपन्यांच्या ऑक्सिजन सिलिंडर प्रकल्पातून कोविड हॉस्पिटलला दररोज ८,६२२ जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा ...

नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नागपुरातील खासगी व व्यावसायिक कंपन्यांच्या ऑक्सिजन सिलिंडर प्रकल्पातून कोविड हॉस्पिटलला दररोज ८,६२२ जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा (एक सिलिंडर ८ हजार लिटर) पुरवठा करण्यात येत आहे. तसे पाहता मागणीच्या तुलनेत पुरवठा कमीच आहे. पण आता प्रकल्पात सिलिंडर रिफिलिंग वाढविण्यात येत आहे. नागपुरात एकूण १० प्रकल्प आणि जवळपास १८ व्यावसायिक कंपन्यांकडून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आहे.

नागपुरात पूर्वीपासून असलेल्या एकूण दहा प्रकल्पामध्ये एअर सेपरेटेबल ऑक्सिजन प्रकल्प तीन (हवेतून ऑक्सिजन घेणे) आणि लिक्विड कॉम्पेसिंग ऑक्सिजन प्रकल्प सात आहेत. सर्व प्रकल्प क्षमतेने काम करीत आहेत. मध्यंतरी ऑक्सिजनचे लिक्विडिफाईड टँकर पुरेसे मिळत नसल्याने पूर्णक्षमतेने ऑक्सिजन निर्मिती होत नव्हती. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नानंतर स्थिती सुधारली आहे.

नागपुरात जवळपास १३० खासगी आणि १२ शासकीय व मनपाचे कोविड हॉस्पिटल आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि कंपन्यांच्या १८ व्यावसायिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना कोणत्या हॉस्पिटलला किती सिलिंडर पाहिजे आहेत, त्याचा दररोजचा कोटा बांधून दिला आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पातून जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलेल्या कोविड हॉस्पिटलला सिलिंडर पोहोचवायचे आहेत. याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी त्या प्रकल्पात बसून घेत आहेत. त्यामुळे प्रकल्पातून कुठेही सिलिंडर जाणार नाही, याची नोंद घेण्यात येत आहे.

भरतीया मेडिकल सर्व्हिसेसचे संचालक बी.सी. भरतीया म्हणाले, सिलिंडर हे लहान-मोठ्या आकारात असतात. त्यात क्युबिक मीटर ऑक्सिजन भरले जाते. मागणीनुसार पुरवठा केला जातो. जम्बो सिलिंडर ७,५०० ते ८ हजार लिटर ऑक्सिजन क्षमतेचे असतात. या सिलिंडरची किंमत २५० रुपये असून, सिलिंडरची ठेव म्हणून १० हजार रुपये घेतले जातात. नागपुरातील कोविड हॉस्पिटलने प्रति बेडनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे ८,६२२ ऑक्सिजन सिलिंडरची नोंदणी केली आहे. पण त्यापेक्षा जास्त १० हजारापेक्षा जास्त सिलिंडर दररोज लागत आहेत. हॉस्पिटलकडून सिलिंडरची मागणी अचानक वाढल्याने एवढ्या सिलिंडरची निर्मिती दररोज होत नाही. पण शासनाच्या प्रयत्नानंतर लिक्विडिफाईड टँकरची मागणी वाढल्यानंतर निर्मितीही वाढली आहे. त्यानंतरही पुरवठ्याच्या तुलनेत हॉस्पिटलचा पुरवठा जास्त आहे.

नागपुरात कमी ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती प्रकल्प असल्याचे कारण म्हणजे अवाजवी विजेचा दर. लगतच्या छत्तीसगड व मध्य प्रदेशात विजेचे दर कमी असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिक्विडीफाईड ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असल्याचे भरतीया यांनी सांगितले. आता हॉस्पिटलला जास्त सिलिंडरचा पुरवठा करायचा झाल्यास प्रकल्पाकडे रिक्त सिलिंडरचा तुटवडा आहे. नवीन सिलिंडरची किंमत दुपटीवर गेली आहे. पुढे सिलिंडरची मागणी कमी झाल्यानंतर रिक्त सिलिंडर पडून राहतील. त्यामुळे जास्त किमतीत कुणीही सिलिंडर खरेदी करीत नाहीत, असे भरतीया यांनी स्पष्ट केले.