शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हॅक्सिनला आता हमीपत्राची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

-लोकमत इम्पॅक्ट नागपूर : कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण होऊन लसीची कार्यक्षमता जवळपास ८१ टक्के चाचणीच्या निष्कार्षातून सामोर ...

-लोकमत इम्पॅक्ट

नागपूर : कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण होऊन लसीची कार्यक्षमता जवळपास ८१ टक्के चाचणीच्या निष्कार्षातून सामोर आली असतानाही, कोरोना प्रतिबंधक लसीकरणात कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांकडून तीन पानांचे हमीपत्र लिहून घेतले जात होते. परिणामी, लाभार्थींचे केंद्रातील अधिकाऱ्यांसोबत खटके उडत होते. अखेर, ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) या संदर्भात नव्या सूचना काढल्या आहेत. त्यानुसार मेडिकलच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर गुरुवारपासून हमीपत्राची मागणी बंद करण्यात आली. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने ९ मार्चच्या अंकात ‘कोव्हॅक्सिनची कार्यक्षमता सिद्ध झाल्यानंतरही लिहून घेतले जात आहे ‘हमीपत्र’ या मथळ्याखाली वृत्त देऊन हा प्रकार उघडकीस आणला होता.

हैदरबादच्या भारत बायोटेक आणि इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हॅक्सिन’ लसीची निर्मिती केली जात आहे. कोव्हॅक्सिन चाचणीचे दोन टप्पे पूर्ण झाले असताना व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू असताना, या लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरलने मंजुरी दिली होती. यावरून वादाला तोंड फुटले होते. ‘सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटी’ने ही लस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे, लस सुरक्षित व कार्यक्षम आढळून आल्याचे म्हटले होते. यामुळे १७ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलया(मेडिकल)च्या केंद्रावर कोव्हॅक्सिन, तर इतर केंद्रांवर ‘कोविशिल्ड’ दिली जात आहे. कोव्हॅक्सिन लस देण्यापूर्वी ‘स्क्रीनिंग आणि संमती’ अर्ज भरून घेतला जात होता. यात या लसीचे फायदे व जोखमी समजल्याचे लाभार्थींकडून लिहून घेतले जात होते. मात्र, मागील आठवड्यात भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण होऊन त्याचे निष्कर्ष सादर केले. यात जवळपास ८१ टक्के लस प्रभावी असल्याचे सांगितले. या संदर्भातील अहवाल ‘डीसीजीआय’कडे सादर करण्यात आला. परंतु, हमीपत्र न घेण्याबाबत कुठल्याही सूचना कोव्हॅक्सिन केंद्रांना प्राप्त झाल्या नव्हत्या. लाभार्थींकडून हमीपत्र लिहून घेताना त्यांच्या नाना प्रश्नाला केंद्रातील कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत होते. वादही निर्माण व्हायचा. अखेर या सर्वांवर आता पडदा पडला. ‘डीसीजीआय’ने कोव्हॅक्सिन लस घेणाऱ्यांकडून हमीपत्र घेऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे आता कोव्हॅक्सिन लसीकरणाला वेग येण्याची शक्यता आहे.

-हमीपत्र घेणे बंद केले

कोव्हॅक्सिन लस घेताना लाभार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेतले जात होते. परंतु, लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली असल्याने व लसीच्या कार्यक्षमतेचा अहवाल सादर करण्यात आल्याने हमीपत्र घेणे बंद केले आहे. मात्र, यासंदर्भात कार्यालयीन आदेश अद्याप आले नाहीत.

-डॉ. उदय नार्लावार, लसीकरण केंद्र प्रमुख, मेडिकल