शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

‘उमरेडचा राजा’ने दिला काेराेना लसीकरणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

उमरेड : समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या उमरेडच्या शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाने यंदा कोरोना तसेच लसीकरणाबाबतचा मौलिक संदेश देणारे ‘बाप्पा’ साकारले आहे. ...

उमरेड : समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या उमरेडच्या शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाने यंदा कोरोना तसेच लसीकरणाबाबतचा मौलिक संदेश देणारे ‘बाप्पा’ साकारले आहे. ‘उमरेडचा राजा’ने दिलेला हा कोरोना लसीकरणाचा संदेश भाविक निश्चितच स्वीकारतील, असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष प्रशांत जयस्वाल यांनी व्यक्त केला.

नियमावलीचे पालन करीत ४ फूट उंच आकर्षक मूर्ती. बाप्पाच्या उजव्या हातात लसीकरण करा, लस सुरक्षित आहे, असा संदेश देण्यात आला आहे. शिवाय बाप्पाच्या मूर्तीमागे स्वच्छता कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर, पोलीस, अधिकारी आदी कोरोनायाेद्ध्यांनाही साकारण्यात आले आहे. सोबतच मंडपाला रुग्णालयाचा ‘लूक’ देण्यात आला असून, सर्वधर्मसमभाव, मुलांची योग्य काळजी घ्या, लसीकरण करा, कोरोनाचे नियम पाळा, मास्क वापरा आदी महत्त्वपूर्ण संदेश देणारे फलकसुद्धा परिसरात लावले आहे. कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत राज्याबाहेरील मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याची, निवास आणि भोजनाची व्यवस्था शिवस्नेहने केली. कोरोना रुग्णांसाठी दोन रुग्णवाहिका नि:शुल्क आणि अल्पदरात देत सामाजिक दायित्व जोपासले आहे.

यावेळी कोरोना महामारीबाबत जागरूकता, लसीकरण आदी बाबी आपण बाप्पाच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोहोचवाव्या असा विचार पुढे आला आणि ही संकल्पना आकाराला आली, असे मत अक्षय खानोरकर यांनी व्यक्त केले. नीलेश इंगळे, प्रेम चांदूरकर, रितेश मने, क्षितिज खानोरकर, राहुल मने, अनुप शेंदरे, राजू ढेबुदास, गणेश मांढरे, विक्की लधवे, वैभव सहारे आदींनी सहकार्य केले.