शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

भिन्न रक्तगटातही मुत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

नागपूर : मूत्रपिंड दाता असतानाही अनेकदा रक्तगट जुळत (मॅच) नसल्याने रुग्णाला ‘डायलिसीस’वर जीवन जगावे लागायचे. परंतु आता ...

नागपूर : मूत्रपिंड दाता असतानाही अनेकदा रक्तगट जुळत (मॅच) नसल्याने रुग्णाला ‘डायलिसीस’वर जीवन जगावे लागायचे. परंतु आता नवे तंत्रज्ञान व औषधोपचारांमुळे भिन्न रक्तगट असले तरी मूत्रपिंड प्रत्यारोपण होत आहे. अशाच प्रकारचे मध्य भारतातील दुसरे मूत्रपिंड प्रत्यारोपण नुकतेच नागपुरात झाले. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. आश्विनीकुमार खांडेकर यांनी आपले अनुभव व कौशल्याचा बळावर एका रुग्णाला जीवनदान दिले.

राजेश गढीकर त्या रुग्णाचे नाव. राजेश हे व्यवसायाने शिक्षक आहे. त्यांना मधुमेह असल्याने मूत्रपिंडावर त्याचा प्रभाव पडला. मूत्रपिंड निकामी झाल्याने २०२० पासून ते डायलिसीसवर होते. त्यांच्या पत्नी अर्चना गढीकर यांनी मूत्रपिंड देण्यात पुढाकार घेतला. परंतु त्यांचा रक्तगट ‘एबी’ तर पतीचा रक्तगट ‘बी’ होता. मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अश्विनकुमार खांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, बी रक्तगट असलेल्या व्यक्ती केवळ ‘बी ’किंवा ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्तीचे मूत्रपिंड स्वीकारू शकतात. अशा वेळी प्रत्यारोपण करायचे असल्यास विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन देऊन शरीरातील ‘अ‍ॅन्टीजेन’ कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच प्रकारे तीन ते पाच वेळा प्लाझ्मा एक्सचेंज करून देखील हे ‘अ‍ॅन्टीजेन’ विशिष्ट पातळीच्या खाली आणावे लागते. राजेश गढीकर यांच्या प्रकरणात इंजेक्शननंतर ‘अ‍ॅन्टीजेन’चा स्तर प्रत्यारोपणास सुयोग्य असल्याचे आढळून आले. यामुळे प्लाझ्मा एक्सचेंज करण्याची गरज भासली नाही. प्रत्यारोपणानंतर रुग्णाला संसर्ग होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. परंतु रुग्णालयातून सुटी झाल्यावर अवघ्या एका महिन्यातच त्यांना कोरोना झाला. रोगप्रतिकारक क्षमता कमी करण्याची औषधे दिली जात असल्याने धोका अधिक होता. मात्र, त्यातूनही त्यांना सुखरुप बाहेर काढले. प्रत्यारोपणाला आता तीन महिने पूर्ण झाले आहे. दाता आणि रुग्ण दोघांची प्रकृती स्थिर आहे, असेही ते म्हणाले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. खांडेकर यांच्या नेतृत्वात युरोलॉजिस्ट डॉ. रवि देशमुख, डॉ. धनंजय बोकारे, डॉ. स्वानंद चौधरी, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. दीपाली गोमासे व नितीन चोपडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

-भिन्न रक्तगटातही प्रत्यारोपणाचा पर्याय

दरवर्षी दोन लाख लोकांना डायलिसीसची गरज असते. मात्र, ५ ते ८ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपणच होतात. अशा वेळी भिन्न रक्तगट असलेले मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्यायही उपलब्ध आहे. यामुळे डायलिसीस वरील अवलंबित्व कमी होऊन जीवन सुसह्य होऊ शकते.

डॉ. आश्विनीकुमार खांडेकर, नेफ्रोलॉजिस्ट