शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘खजुरा’ची शेती

By admin | Updated: June 10, 2017 02:38 IST

जिल्ह्यात खजुराची शेती होत आहे, असे कुणी म्हटले, तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे.

भरघोस उत्पादन : शेतकऱ्याचा पाच एकरात यशस्वी प्रयोग लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात खजुराची शेती होत आहे, असे कुणी म्हटले, तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. एका शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेतीत खजुराच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. एवढेच नव्हे, तर त्यातून भारघोस उत्पादनही घेत आहे. नागपुरातील उष्ण आणि कोरडे वातावरण खजुराच्या शेतीसाठी पोषक ठरत आहे. स्वरन तंगवेल असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याचे मोहगाव झिल्पी बांधाशेजारी शेत आहे. त्यांनी आपल्या शेतावर २००९ मध्ये खजुराच्या झाडांची लागवड केली. आता त्याला फळधारणा सुरू झाली आहे. त्यातून त्यांना दरवर्षी अनेक क्विंटल खजुराचे उत्पादन होत आहे. स्वरन यांच्या मते, खजुराचे नाव घेताच अरब देशातील चित्र डोळ्यासमोर उभे राहते. काही वर्षांपूर्वी माझे वडील दक्षिण भारतात फिरायला गेले होते. तेथे त्यांना खजुराची शेती दिसली. त्यानंतर मी स्वत: खजुराच्या शेतीचे प्रशिक्षण घेतले आणि परत येताच खजुरांच्या १२० झाडांची शास्त्रोक्त पद्घतीने लागवड केली. या झाडांच्या लागवडीसाठी जमिनीत जैविक खाताची गरज असते. सुरुवातीची काही वर्षे झाडांची काळजी घ्यावी लागली. यानंतर चौथ्या वर्षापासून प्रत्येक झाडाला २५ ते ३० किलो फळधारणा सुरू झाली. आता त्याच झाडांपासून प्रत्येक वर्षी ९० किलोपर्यंत फळे मिळत आहेत. यामुळे झाडांची लागवड करण्यासाठी लागलेल्या खर्चाची पहिल्याच वर्षी वसुली झाली. प्रत्येक वर्षी १५ जूनपासून खजुराचे उत्पादन मिळायला सुरुवात होते. यानंतर एक ते दीड महिन्यात सर्व फळांची विक्री होते. अमरावती व मुंबई येथील व्यापारी शेतातूनच फळांची खरेदी करतात. स्वरन यांनी या खजुराच्या शेतीसाठी पदवी शिक्षण मध्येच बंद केले. ते म्हणाले, खजुराच्या लागवडीसाठी फार मोठा खर्च येतो. त्यामुळे खजुराच्या शेतीसाठी गुजरातमध्ये ५० टक्के आणि राजस्थानमध्ये ७५ टक्के अनुदान दिले जाते. स्वरन यांनी सध्या आपल्या शेतात खजुरासोबतच ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, नारळ व भाजीपाल्याची सुद्धा लागवड केली आहे.