शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंचा मुक्काम रविभवनातच

By admin | Updated: November 25, 2015 07:17 IST

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या निवासाच्या

अधिवेशनाची तयारी : बावनकुळे, मुनगंटीवार सख्खे शेजारीनागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या निवासाच्या दृष्टीने रविभवन येथील कॉटेजचे वाटप केले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने एकमेकांचे शेजारी असलेले ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर) व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर) यांचा रविभवनातील मुक्कामही एकमेकांच्या शेजारीच असणार आहे. मुनगंटीवार यांना कॉटेज क्रमांक ४ तर बावनकुळे यांना कॉटेज क्रमांक ५ मिळाले आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी देवगिरीची मागणी केली होती. या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्र्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आपणच असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप त्यांची ही मागणी मान्य केलेली नाही. रविभवन येथील कॉटेज क्रमांक १ त्यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना कॉटेज क्रमांक २, परिवहन मंत्री दिवाकर रावते ३, पर्यावरण मंत्री रामदास कदम ६, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे ७, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ८, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील ९, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे १०, उद्योगमंत्री सुभाष देसाई ११, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट १३, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन १४, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर १५, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत १६ व सामाजिक न्यायमंत्री राजाराम बडोले यांच्यासाठी कॉटेज क्रमांक २१ आरक्षित ठेवण्यात आले आहे. अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेबदल झाल्यास रविभवन येथील कॉटेज आरक्षणात बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्यमंत्र्यांसाठी नागभवन येथील कॉटेज आरक्षित ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या कॉटेज आरक्षणाचा विचार करता यात फारसा बदल झालेला नाही. कॉटेज क्रमांक ५ गेल्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आरक्षित होते. यावेळी येथे चंद्रशेखर बावनकुळे मुक्कामास आहेत. (प्रतिनिधी)देवगिरीचे गूढ कायम देवगिरीची रंगरंगोटी करण्यात आल्याने येथे एकनाथ खडसे वास्तव्यास राहतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यातच खडसे यांनी देवगिरीची मागणी केल्याने कालावधीत त्यांचा मुक्काम देवगिरीवर राहणार असल्याची चर्चा होती. परंतु रविभवन येथील कॉटेज क्रमांक १ त्यांच्यासाठी आरक्षित करण्यात आल्याने देवगिरीवर कुणाचे वास्तव्य राहणार याबाबतचे गूढ कायम आहे.