शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

मंडळ अधिकाऱ्यासह काेतवालास जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी व काेतवालाने रेती वाहतुकीचा ट्रक थांबवून राॅयल्टीची मागणी केली असता, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी व काेतवालाने रेती वाहतुकीचा ट्रक थांबवून राॅयल्टीची मागणी केली असता, ट्रकचालकाने दाेघांनीही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि रेती राेडवर टाकून ट्रक घेऊन पळ काढला. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आवंढी-साेनेगाव (राजा) मार्गावर शुक्रवारी (दि. १७) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

राज्य शासनाने पावसामुळे रेतीच्या उपशावर बंदी घातली असताना कामठी तालुक्यातील कन्हान नदीच्या पात्रातून माेठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा व वाहतूक अव्याहतपणे सुरूच आहे. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी संजय दशरथ कांबळे (५३) व कोतवाल मंगेश दामोदर चंदनखेडे (३५, रा. आवंढी, ता. कामठी) हे दाेघेही शुक्रवारी दुपारी आवंढी शिवारात खरीप पिकांच्या आणेवारीसाठी गेले हाेते. त्यांना आवंढी-साेनेगाव (राजा) मार्गावर एमएच-४०/बीएल-६९३९ क्रमांकाचा ट्रक येताना दिसला.

संशय आल्याने दाेघांनीही हा ट्रक थांबवून ट्रकची पाहणी केली. त्यात रेती आढळून येताच ट्रकचालकास रेती वाहतुकीच्या राॅयल्टीची मागणी केली. ट्रकचालकाने दाखविलेली राॅयल्टी बनावट असल्याचे लक्षात येताच संजय कांबळे यांनी त्याल विचारणा करत रेतीसह ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्याची सूचना केली. संजय कांबळे यांच्या सूचनेवरून मंगेश चंदनखेडे ट्रकच्या केबिनमध्ये बसले व कामठीच्या दिशेने निघाले.

दरम्यान, ट्रकचालकाने मध्येच आवंढी- गादा राेडवर ट्रक थांबविला व शिवीगाळ करत मंगेश चंदनखेडे यास काॅलर पकडून धक्काबुक्की केली व त्यांना ट्रकखाली उतरून देत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने ट्रकमधील रेती राेडवर टाकून ट्रकने नागपूरच्या दिशेने पळ काढला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी ट्रकचालक सत्यवान याच्या विराेधात भादंवि ३५३, ३७९, २८३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर करत आहेत.

...

रेतीची खुलेआम चाेरी

सध्या रेतीघाट बंद असले तरी कन्हान नदीच्या पात्रातून राेज शेकडाे ब्रास रेतीचा अवैध उपसा केला जात असून, ती रेती चाेरून नेली जात आहे. याबाबत महसूल व पाेलीस विभागातील अधिकाऱ्यांना माहिती असून, या रेतीचाेरीत राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याने दबावापाेटी अधिकारी रेती तस्करांवर कारवाई करत नाही. रेती तस्करांनी अधिकाऱ्यांसाेबत आर्थिक संबंधही प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे रेती तस्करांची हिंमत वाढल्याने असले प्रकार घडत आहेत.

...

कामठी तालुक्यातील कन्हान नदीवरील बिना, नेरी, उनगाव, साेनेगाव (राजा), चिकना तसेच काेलार नदीवरील वारेगाव रेती घाटांतून कुणी रेतीचा अवैध उपसा करत असले तर त्यांची गय केली जाणार नाही. चाेरट्यांवर कठाेर प्रशासकीय कारवाई केली जाईल.

- अक्षय पाेयाम,

तहसीलदार, कामठी.