लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर स्टाईलसाठी माणसे सलूनमध्ये जातात. मात्र या लॉकडाऊनच्या काळात टक्कल ठेवणे हीच आता फॅशन बनू पाहत आहे.
वारंवार सलूनमध्ये जावे लागू नये आणि दुकाने बंद राहिल्यास अडचण येऊ नये, यासाठी अनेकांनी थेट टक्कलच करवून घेतले आहे. धर्ममान्यतेनुसार ज्यांना टक्कल ठेवणे चालत नाही, अशी माणसे ट्रिमरच्या मदतीने केस अगदीच लहान ठेवत आहेत. सलून दुकनदारांना लॉकडाऊननंतर दुकाने उघडण्याची परवानगी दिल्यावर रोज १० ते २० ग्राहक यायचे. अनेकांची टक्कल करण्याची किंवा अगदीच लहान केस ठेवण्याची मागणी असायची. फक्त युवकच नव्हे तर वयस्क, मुलेही यासाठी गर्दी करीत होते.
...
डिस्पोजेबल ॲप्रन आणि नॅपकिनची मागणी
सलून संचालक संतोष बंदेवार म्हणाले, संक्रमण वाढू नये यासाठी सलून सॅनिटाईझ केले जायचे. कंगवा, वस्तरा, कैची आदी साहित्यही निर्जंतूक केले जात असत. नॅपकिन आणि ॲप्रन धुवून उपयोगात आणले जात असत. मात्र ग्राहकांच्या मागणीनंतर डिस्पोजेबल ॲप्रन आणि नॅपकिनची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे दाढी आणि कटिंगचा दर वाढला आहे. ग्राहकांनी याला प्रतिसादही दिला आहे.
...
घरपोच सेवाही दिली
कोरोना काळामध्ये अनेक ग्राहकांनी घरी येऊन सेवा देण्याची मागणी केली. यात मोठ्या संख्येने उच्च आणि मध्यम वर्गातील ग्राहकांचा समावेश होता. त्यांना दुकानापेक्षा अधिक दर द्यावा लागला. त्यांनीही डिस्पोजेबल ॲप्रन आणि नॅपकिनची मागणी केली. यातीलही बऱ्याच नागरिकांनी टक्कल करण्याची मागणी केली होती. त्याचा फॅशन म्हणून स्वीकार केला. मात्र कोरोना संक्रमण वाढल्यामुळे सध्या अनेक दुकानदार घरपोच सेवा टाळत आहेत.
...