शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

स्टार बसेस चकाचक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2016 05:33 IST

शहरातील नागरिकांना चांगली प्रवासी सेवा उपलब्ध करण्यासाठी स्टार बससेवा अधिक सक्षम व दर्जेदार करा सोबतच सर्व

नागपूर : शहरातील नागरिकांना चांगली प्रवासी सेवा उपलब्ध करण्यासाठी स्टार बससेवा अधिक सक्षम व दर्जेदार करा सोबतच सर्व बसेस पाण्याने धुवून चकाचक ठेवा, असे निर्देश महापालिकेच्या परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी सोमवारी समितीचे पदाधिकारी, कंत्राटदार व परिवहन विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत दिले. दररोज ४० बसेस धुतल्या पाहिजे तसेच मोरभवन येथे काही वेळ बसेस उभ्या राहतात. या कालावधीत त्या स्वच्छ करून बसमधील कचरा बाहेर काढा, यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा. बसचालकांना वाहतूक नियामांचे ज्ञान असावे. प्रवाशांना सौजन्याची वागणूक मिळावी. यासाठी चालक व वाहकांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात यावे. महिला व विद्यार्थिंनींना प्रवासादरम्यान त्रास होऊ नये यासाठी बसफेऱ्याचा आढावा घेऊ न पुढील शैक्षणिक सत्रापासून जादा बसेस सोडण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बसथांबा असलेल्या ठिकाणी बसफेऱ्यांचे वेळापत्रक लावण्याचे निर्देश व्हीएनआयएल यांना देण्यात आले. तत्कालीत महापौर अर्चना डेहनकर यांच्या कार्यकाळात महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली होती. परंतु लवकरच ही सेवा बंद करण्यात आली. यासंदर्भात अहवाल सादर करा. बसथांबा असेल त्याच ठिकाणी बसेस थांबविण्यात याव्या. काही थांब्यांवर बसेस न थांबविता पुढे जाऊ न थांबविल्या जातात. त्यामुळे थांब्याचा वापर होत नाही. महापालिका व व्हीएनआयएल अधिकाऱ्यांनी शहरातील थांब्यांचा सर्वे करून अहवाल सादर करावा. विद्यार्थ्यांची मागणी असेल तर जादा बसेस सोडण्यात याव्या. परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे, भ्रमणध्वनी क्रमांक, तक्रारनिहाय टोल फ्री क्र मांक फलकावर लावण्याचे निर्देश देण्यात आले. अपर आयुक्त नयना गुंडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक कर्नल एस.जे. मुजुमदार, प्रमोद पुराणिक, इरशाद पठाण, संजय अलोणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)