शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सखींनी बांधल्या सैनिकांना राख्या

By admin | Updated: August 11, 2014 00:51 IST

लोकमत सखी मंच कामठीच्यावतीने रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त सखी मंचच्या सदस्यांनी कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील छात्रसेना अधिकारी व सैनिक बांधवांना राख्या बांधल्या.

लोकमत सखी मंचचे कामठीत रक्षाबंधनकामठी : लोकमत सखी मंच कामठीच्यावतीने रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त सखी मंचच्या सदस्यांनी कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील छात्रसेना अधिकारी व सैनिक बांधवांना राख्या बांधल्या. रविवारी सकाळच्या सुमारास लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांच्या मार्गदर्शनात नागपुरातील सखींनी कामठी छात्रसेना प्रशिक्षण केंद्रातील लेफ्टनंट कर्नल (प्रशासन अधिकारी) मनीष सक्सेना यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सखींनी सैनिक बांधवांना राखी बांधून बहीण-भावाच्या अतूट बंधनाचे दर्शन घडविले. यावेळी मनीष सक्सेना म्हणाले, लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी सैनिक प्रशिक्षण केंद्रातील सैनिकांना राख्या बांधल्याने त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. पंजाबमधून आलेले नायक सुभेदार, रायबरेली (उत्तरप्रदेश) येथील सुभेदार मेजर व्ही. श्रीवास्तव, नेपाळ येथील सुभेदार जितेंद्र आले, हिमाचल प्रदेशातील आॅफिसर्स कॅडेड विकास, लुधियानाचे हवालदार जरनैलसिंग, अलाहाबादचे हवालदार अरुणकुमार यांनीही यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.रक्षाबंधन हा सण आपण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करीत असल्याचा आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमामुळे बहुतांश अधिकारी व सैनिक भारावून गेले होते. सर्वांनी सखी मंचच्या या उपक्रमांची प्रशंसा करीत आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संयोजिका नेहा जोशी यांनी केले.आयोजनासाठी सुरूज धोंडे यांनी सहकार्य केले.विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या राख्या बांधल्यादेशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना कर्तव्याच्या भावनेतून अनेक विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या लोकमतच्या माध्यमातून सैनिकांना पोहचविल्या. यावर्षी लोकमतला प्रागतिक महाविद्यालय कोराडी, धनवटे नॅशनल कॉलेज, मूकबधिर विद्यालय सावनेर, अकोला लोकमत कार्यालय, जिल्हा परिषद प्रा. शाळा उपरवाही, कळमेश्वर येथून राख्या प्राप्त झाल्या. सखी मंचच्या सदस्यांनी या राख्या सैनिकांना बांधून विद्यार्थ्यांमध्ये सैनिकांप्रति असलेल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुरज दोंडे यांचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)