शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

काटोल नगराध्यक्षांना दिलासा नाकारला

By admin | Updated: August 22, 2014 01:34 IST

सार्वजनिक कामांत आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे काटोल नगराध्यक्ष व दहा सदस्यांना बजावण्यात आलेली अपात्र ठरविण्यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस रद्द करण्यास मुंबई उच्च

हायकोर्ट : रिट याचिका निकालीनागपूर : सार्वजनिक कामांत आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे काटोल नगराध्यक्ष व दहा सदस्यांना बजावण्यात आलेली अपात्र ठरविण्यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे.सार्वजनिक कामे करताना आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे शासनाने २ आॅगस्ट रोजी काटोल नगराध्यक्ष व दहा सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून सहा वर्षांसाठी अपात्र का ठरविण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती. यावर उत्तर सादर करण्यासाठी १५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. तत्पूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. त्यांनी सार्वजनिक कामांत गैरव्यवहार झाल्याने संबंधित सदस्य कारवाईस पात्र असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल दिला होता.नगराध्यक्ष व सदस्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून कारणे दाखवा नोटीस रद्द करण्याची विनंती केली होती. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अतुल चांदूरकर यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. शासनाला उत्तर पाठविण्याची अंतिम तारीख निघून गेल्यामुळे याचिकाकर्त्यांनी मुदत वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांना २८ आॅगस्टपर्यंत मुदत वाढवून देऊन याचिका निकाली काढली. (प्रतिनिधी)