शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘कारवाँ-ए-अदब’ने श्रोते मंत्रमुग्ध

By admin | Updated: November 5, 2014 00:53 IST

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे उर्दू गझल व शायरीच्या रसिकांसाठी नुकतीच ‘कारवाँ-ए-अदब’ ही अखिल भारतीय मुशायरा मैफिल आयोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शायर निदा फाजली,

मुशायरा मैफिल : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजननागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे उर्दू गझल व शायरीच्या रसिकांसाठी नुकतीच ‘कारवाँ-ए-अदब’ ही अखिल भारतीय मुशायरा मैफिल आयोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शायर निदा फाजली, वसीम बरेलवी, मुनव्वर राणा, राहत इंदौरी, गुलजार देहलवी, पापुलर मेरठी, नुसरत मेहंदी व मंजर भोपाली यांच्या शायरींनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. केंद्र संचालक डॉ. पीयूषकुमार संयोजित ही मैफिल केंद्राच्या खुल्या मंचावर झाली.‘दयारे दिलमे नया सा चिराग कोई जल रहा है, मै जिसकी दस्तक मुजावर था, वो लम्हा मुझे बुला रहा है’ अशाप्रकारे या मैफिलीतील प्रत्येक लम्हा श्रोत्यांसाठी यादगार बनून गेला. पद्मश्री निदा फाजली हे लफ्जों के फुल, मोर नाच अशा संग्रहांसह रजिया सुल्ताना, तमन्ना, सरफरोश अशा सिनेरचनांचे धनी आहेत. त्यांच्या खास ‘अपना गम लेके कही और न जाया जाए, घरमे बिखरी हुई चिजोको सजाया जाए, घरसे मज्जित है बहोत दूर, चलो यू करले किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए’ या शायरीने मैफिल रंगतदार ठरली. वसीम बरेलवी त्यांच्या ‘लोग पानी का फतरा ही समझे वसीम, कौन आसू के अंदर खुदा देखता’ या शेरच्या आठवणीने डोळे पाणावले. शायर मुनव्वर राणा यांच्या रचनांचे हिंदी, बंगाली व पाश्चात्य भाषेत अनुवाद झाले आहे. राणा यांचा ‘एक आसू भी खतरा है सियासत के लिए, तुमने देखा नही आँखो का समंदर होना’ हा शेर शासनकर्त्यांसाठी गर्भित इशाराच होता. महिला शायर नुसरत मेहंदी मौलिक संदेश देऊन गेल्या. ‘औरत को ना बेचारी किजिए, हो सके तो हमारी तारीफ लिखिये, बेटियो के लिए भी हात उठाओ मंजर, अल्लाहसे सिर्फ बेटे नही मांगा करते’ अशा त्या म्हणाल्या. राहत इंदौरी, गुलजार देहलवी, नुसरत मेहंदी, हास्यकवी डॉ. पापुलर मेरठी, मंजर भोपाली व अनवर जलालपुरी यांनीही श्रोत्यांना रिझविले. ही मैफिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समर्पित करण्यात आली. याप्रसंगी शायर शरीफ अहमद शरीफ यांच्या शेरो-शायरीच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विकास मिश्रा, ओ.पी. सिंग, आलोक कन्सर, देवेंद्र पारीख, हबीब खान, डॉ. सतीश वटे प्रमुख अतिथी होते. शायर कासीम इमाम यांनी सूत्रसंचालन, तर श्वेता शेलगावकर यांनी प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी)