शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कालीदास महोत्सव : अंतर्मनात गुंजले ‘संगीता’च्या व्हायोलिनचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:34 IST

व्हायोलिनमधून निघणाऱ्या हळुवार स्वरांमध्ये सूर, ताल आणि लय सामावलेले आहे. मानवी मनातल्या सगळ्या भावनांची, संवेदनांची सुरेल अशी अभिव्यक्त म्हणजे डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या वाद्याला झाला की दैवी सुरातून एक विश्व निर्माण होते. अंतर्मनाच्या खोलवर गुंजणाऱ्या दैवी सुरांची अनुभूती गुरुवारी रसिकांनी अनुभवली. अगदी तल्लीन होऊन हा माधुर्याचा हा ठेवा सुरेश भट सभागृहात उपस्थित रसिकांना सुखद आनंद देऊन गेला.

ठळक मुद्देसुमधूर लयवादनाची रसिकांना भुरळ : मुलगी नंदिनी यांनीही दिली सुमधूर साथ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हायोलिनमधून निघणाऱ्या हळुवार स्वरांमध्ये सूर, ताल आणि लय सामावलेले आहे. मानवी मनातल्या सगळ्या भावनांची, संवेदनांची सुरेल अशी अभिव्यक्त म्हणजे डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या वाद्याला झाला की दैवी सुरातून एक विश्व निर्माण होते. अंतर्मनाच्या खोलवर गुंजणाऱ्या दैवी सुरांची अनुभूती गुरुवारी रसिकांनी अनुभवली. अगदी तल्लीन होऊन हा माधुर्याचा हा ठेवा सुरेश भट सभागृहात उपस्थित रसिकांना सुखद आनंद देऊन गेला.सांगता समारोहाच्या सुरुवातीच्या सत्रात त्यांचे व्हायोलिन वादन होते; सोबत त्यांची कन्या उदयोन्मुख व्हायोलिनवादक नंदिनी हीसुद्धा होती. तबल्यावर साथ दिली पंडिता अनुराधा पाल यांनी. सतार, सरोद आणि व्हायोलिन या तंतुवाद्यांचा स्थायीभावच वेगळा आहे. गायनातील शब्द व व त्यांच्या मर्यादित अर्थाच्या बंधनातून पूर्णपणे मोकळी असणारी ही वाद्ये आहेत. एन. राजम यांच्याकडून लाभलेला मधुर वादनाचा वारसा डॉ. संगीता यांनी असाधारण रियाज, चिंतन आणि रागांच्या अभ्यासातून अधिक उंचीवर नेऊन समृद्ध केला. ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या संकल्पनेवरील महोत्सवात ‘राग शामकल्याण’सह त्यांनी व्हायोलिन वादनाला सुरुवात केली. ‘रटन लगी शाम नाम की...’ या बंदिशीसह विलंबित एकताल, आडा चारताल यावर वाढवत द्रुत आडा चारतालपर्यंत ही लय शिखर गाठत गेली. बनारस घराण्याच्या शैलीतील हे वादन ४० ते ४५ मिनिटे निनादत होते आणि कुणी संमोहित केल्यासारखी जादू श्रोत्यांवर होती. हळुवार सुरुवात होत वेगवान टोकावर नेऊन ही बंदिश त्यांनी संपविली. लयबद्ध वादन, लयकारीचा अनोखा डौल, स्वरांवरील अचूक पकड व यातून निर्माण झालेले मुलायम स्वरध्वनी रसिकांच्या कानामनातून हृदयापर्यंत तरंगत होते. यानंतर श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव राग खमाजमधील बनारसी दादरा त्यांनी सादर केला. पुढे ‘नरवर कृष्णा समान...’ या नाट्यपदावरील सादरीकरणाने त्यांनी वादनाचे समापन केले. कलाकार व श्रोते यांना स्वरतालातून शब्दांपलीकडचा अनामिक सुखद आनंद देणाऱ्या या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.

 

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवmusicसंगीत