शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

काकाची हत्या, जन्मठेप कायम

By admin | Updated: September 5, 2014 01:09 IST

क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणादरम्यान काकाची हत्या करणाऱ्या पुतण्याची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील आहे.

हायकोर्ट : अमरावती जिल्ह्यातील घटनानागपूर : क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणादरम्यान काकाची हत्या करणाऱ्या पुतण्याची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील आहे.सुनील झोलबा मडावी असे आरोपीचे नाव असून तो वासड, ता. धामणगाव रेल्वे येथील रहिवासी आहे. मृताचे नाव श्रावण मडावी होते. अमरावती सत्र न्यायालयाने ४ आॅक्टोबर २०११ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.ही घटना १३ आॅगस्ट २०१० रोजी घडली होती. आरोपीचे एका व्यक्तीसोबत भांडण झाले होते. मृताचा मुलगा मनोहर भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला. दरम्यान, आरोपीने संबंधित व्यक्तीला सोडून मनोहरलाच मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे मनोहर घरी पळून लपला. यानंतर आरोपी विळा घेऊन तेथे पोहोचला. आरोपीचा आवाज ऐकून श्रावण घराबाहेर आला. दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने श्रावणची पोटात विळा भोसकून हत्या केली. श्रावणचा २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेचे दोन प्रत्यक्ष साक्षीदार होते. तसेच, श्रावणने मृत्यूपूर्व बयानात घटना सांगितली होती. शासनातर्फे एपीपी नहुष खुबाळकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)