शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

न्या. भूषण गवई यांना स्थानांतरित करू नका

By admin | Updated: May 4, 2017 02:12 IST

न्यायमूर्ती भूषण गवई यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून अन्यत्र स्थानांतरित करण्यात येऊ नये अशी विनंती

प्रस्ताव पारित : मुख्य न्यायमूर्तींना करण्यात येईल विनंती नागपूर : न्यायमूर्ती भूषण गवई यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून अन्यत्र स्थानांतरित करण्यात येऊ नये अशी विनंती मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लुर यांना करण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या सर्वसाधारण सभेमध्ये बुधवारी एकमताने प्रस्ताव पारित करण्यात आला. या प्रस्तावानुसार, मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लुर यांना संघटनेच्या वतीने निवेदन सादर करून न्यायमूर्ती भूषण गवई यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून अन्यत्र स्थानांतरित करण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात येणार आहे. न्या. गवई नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती आहेत. ते नागपूर खंडपीठातच कायम राहावेत अशी वकिलांची इच्छा आहे. त्याकरिता मुख्य न्यायमूर्तींना विनंती करणे आवश्यक आहे. परिणामी अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, अ‍ॅड. आर. सी. माडखोलकर, अ‍ॅड. जे. एस. मोकादम, अ‍ॅड. आर. एस. नायक, अ‍ॅड. अंजली भांडारकर, अ‍ॅड. आर. एम. पांडे, अ‍ॅड. मंगेश बुटे, अ‍ॅड. रजनीश व्यास यांच्यासह अनेक वकिलांनी हायकोर्ट बार असोसिएशनला निवेदन देऊन मुख्य न्यायमूर्तींना विनंतीपत्र सादर करण्याच्या मुद्यावर निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी संघटनेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.(प्रतिनिधी) न्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातच कायम राहावे ही वकिलांची मागणी योग्य आहे. त्यामुळे संघटनेची सर्वसाधारण सभा आयोजित करून त्यात या मागणीचा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला. - अ‍ॅड. अनिल किलोर, अध्यक्ष, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर.