शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

रणजित पाटील यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी

By admin | Updated: October 22, 2016 02:35 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशाच्या अवमानना प्रकरणात नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील व नागपूर

हायकोर्ट : २८ नोव्हेंबरला व्यक्तीश: हजर व्हावे लागणारनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशाच्या अवमानना प्रकरणात नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील व नागपूर मनपाच्या नगर रचना विभागाचे सहायक संचालक या प्रतिवादींविरुद्ध प्रत्येकी १० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट बजावला आहे. प्रकरणावर २८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली असून त्यावेळी या दोन्ही प्रतिवादींना न्यायालयात हजर राहून उत्तर सादर करावे लागेल.निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी ही याप्रकरणातील पीडित पक्षकार आहे. संस्थेच्या गृहनिर्माण योजनेत रोड तयार करण्यासाठी महानगरपालिकेला जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. निर्णयास विलंब केला नागपूर : मनपाने या मोबदल्यात संस्थेला टीडीआर दिलेला नाही. यामुळे संस्थेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायदा-१९६६ मधील कलम ४७ अंतर्गत राज्याच्या नगर विकास विभागाकडे अपील दाखल केले होते. राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अपिलवर सुनावणी घेतल्यानंतर आॅगस्ट-२०१५ रोजी निर्णय राखून ठेवला. हा निर्णय अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. निर्णयास विलंब होत असल्याच्या कारणामुळे संस्थेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २५ एप्रिल २०१६ रोजी संस्थेच्या अपिलवर दोन महिन्यांत निर्णय जाहीर करण्याचा आदेश शासनास दिला होता. या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. परिणामी संस्थेने अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने गेल्या २८ सप्टेंबर रोजी डॉ. रणजित पाटील व मनपाला अवमानना नोटीस बजावून अपिलवर निर्णय घेण्यासाठी १८ आॅक्टोबरपर्यंत वेळ दिला होता. यानंतरही अपिलवर निर्णय देण्यात आला नाही. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने डॉ. रणजित पाटील व मनपाच्या नगर रचना विभागाचे सहायक संचालकांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावला आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संस्थेतर्फे अ‍ॅड. श्रद्धानंद भुतडा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)