शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘गाईड’विनाच अभयारण्यात जंगल सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

उमरेड : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात शुक्रवारी जंगल सफारी करण्यासाठी ‘गाईड’ला सोबतीला न देताच जंगल सफारी केल्या गेल्याचा प्रकार समोर आला ...

उमरेड : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात शुक्रवारी जंगल सफारी करण्यासाठी ‘गाईड’ला सोबतीला न देताच जंगल सफारी केल्या गेल्याचा प्रकार समोर आला आहे. गाईडविनाच जंगल सफारी झाल्याने पर्यटकांचा हिरमोड बघावयास मिळाला. कऱ्हांडला गेटवर कार्यरत गाईड संपावर गेल्याने पर्यटकांची निराशा झाली. सदर अभयारण्यातील महत्त्वपूर्ण कऱ्हांडला गेटवर एकूण २८ गाईड कार्यरत आहेत. तीन महिन्यापासून सतीघाट तलाव आणि रानबोडी परिसर बंद ठेवण्यात आले आहे. अन्य दोन मार्गावर वाहने धावतात. या मार्गावर पर्यटकांना वन्यप्राणी दिसत नाहीत. यामुळे सतीघाट आणि रानबोडी परिसर पर्यटकांसाठी सुरू करण्यात यावा, अशी स्थानिक महाराष्ट्र राज्य गाईड युनियनची मागणी आहे.

याबाबत अनेकदा विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) आर. बी. गवई यांच्याशी गाईड युनियनने चर्चासुद्धा केली. गवई याप्रकरणी कोणतेही उत्तर देत नाहीत असा आरोप युनियनचा आहे. शिवाय ऑनलाईन वाहन रद्द झाल्यानंतर स्पॉटवर ऑफलाईन नोंदणी घेतली जात नाही, असाही आरोप युनियनच्या वतीने करण्यात आला आहे. पूर्वी या गेटवरून २० गाड्या सोडल्या जात होत्या. यामध्ये १८ ऑनलाईन आणि दोन गाड्या व्हीआयपी असायच्या. आता या गाड्यांची संख्यासुद्धा कमी करण्यात आली आहे. सध्या केवळ १२ गाड्या ऑनलाईन आणि दोन गाड्या व्हीआयपींच्या आहेत. सदर समस्येकडे वन्यजीव विभागाने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सी. एस. गेडाम, एल. एस. मांढरे, पंकज ठक्कर, विद्याधन उके, नितीन वाढई, विकास सवाईमुल, नितीन वाढई, स्वप्निल ठक्कर आदींसह संपूर्ण गाईडनी दिला आहे.