शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मुलासह आईची तलावात उडी

By admin | Updated: July 23, 2015 02:49 IST

एका महिलेने आपल्या दुधपित्या मुलासह अंबाझरी तलावात उडी घेतली. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

अंबाझरी तलावातील घटना : आईचा मृतदेह सापडला नाहीनागपूर : एका महिलेने आपल्या दुधपित्या मुलासह अंबाझरी तलावात उडी घेतली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. चिमुकल्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. अंबाझरी पोलीस रात्री उशिरापर्यंत महिला व मुलाची ओळख पटविण्याच्या कामात गुंतले होते. परंतु ओळख पटविता आली नाही. बुधवारी सकाळी ११ वाजता एक महिला मुलाला कडेवर घेऊन अंबाझरी ओव्हर फ्लोच्या पायऱ्यांवर चढली आणि तलावाच्या काठावर आली. त्यावेळी आकाशात ढग दाटून आले होते. तलावाच्या काठावर अनेक लोक बसले होते. अचानक महिलेने मुलासह तलावात उडी घेतली. नागरिकांनी आरडाओरड केली. लगेच पोलिसांना सूचना दिली. अंबाझरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस.व्ही. त्रिपाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अग्निशमन दलाला सूचना दिली. तलावात पोहणाऱ्या स्थानिक नागरिकांनाही बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या बोटीने तलावात महिला व मुलाचा शोध घेण्यात आला. दुपारी २.३० च्या दरम्यान मुलाचा मृतदेह हाती आला. चिमुकला दीड ते दोन वर्षाचा होता. मुलाने काळ्या रंगाचे ठिपके असलेला पांढरी टी शर्ट आणि निळ्या रंगाचे फुलं असलेला पांढरा पायजामा घातला होता. मुलाच्या दोन्ही हातावर पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे मोती असलेले लॉकेट बांधले होते. अंबाझरी पोलिसांनी सर्व ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांचे फोटो सुद्धा तपासून पाहिले जात आहे. महिलेचा मृतदेह हाती लागलेला नाही तसेच ओळखही पटविता आली नाही. (प्रतिनिधी)