शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

जेपींच्या उपदेशामुळे जीवनाला शिस्त लागली

By admin | Updated: October 17, 2014 01:02 IST

एकीकडे जगताना अन्न मिळत नाही आणि दुसरीकडे पोट भरलेल्या व्यक्ती अन्न फेकून देतात, श्रम करणाऱ्याला घाम गाळूनही कष्टाचे मोल मिळत नाही, अशा प्रकारच्या जयप्रकाश नारायण यांच्या

दीपमाला कुबडे : ‘आठवणीतील जेपी’ यावर व्याख्याननागपूर : एकीकडे जगताना अन्न मिळत नाही आणि दुसरीकडे पोट भरलेल्या व्यक्ती अन्न फेकून देतात, श्रम करणाऱ्याला घाम गाळूनही कष्टाचे मोल मिळत नाही, अशा प्रकारच्या जयप्रकाश नारायण यांच्या शिबिरातून झालेल्या उपदेशामुळे जीवनाला शिस्त लागली, असे प्रतिपादन जयप्रकाश नारायण यांच्या मानसकन्या प्रा. दीपमाला कुबडे यांनी आज येथे केले.सर्वोदय आश्रमाच्या वतीने ‘आठवणीतील जेपी’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. दमयंती पांढरीपांडे होत्या. प्रा. दीपमाला कुबडे म्हणाल्या, तरुणवयात अनेक मोठ्या व्यक्तींच्या सहवासाचे भाग्य मला लाभले. १९४२ च्या क्रांतीत जेपींनी भूमिगत राहून हिंदुस्थान ढवळून टाकला. ते स्वभावाने प्रेमळ होते. दुष्काळी परिस्थितीत त्यांच्यासोबत कपडे गोळा करून ते गरिबांना वाटले. त्यांच्या विचारांचा, कार्याचा प्रभाव मनावर झाला आणि मी त्यांची शिष्य झाले. इंदूरच्या शिबिरात त्यांनी श्रमाचे महत्त्व पटवून दिले. गरिबी काय असते हे सांगणारे जेपींचे भाषण कधीच विसरूशकत नाही. त्या शिबिरानंतर माझ्यात आमूलाग्र बदल झाला. त्यानंतर तरुण शांती सेनेशिवाय इतर कुठल्याच उपक्रमात सहभागी झाले नाही. गावोगावी शिबिरे घेण्यास सुरुवात केली. एकदा युवक काँग्रेसचे १५० जण हातात काठ्या घेऊन चालून आले होते. परंतु धैर्याने त्यांचा सामना केला. शिबिरात आम्ही एकमेकांना पुस्तके वाचण्यासाठी देत होतो. जेपींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पदयात्रा काढली आणि २५०० डाकू आत्मसमर्पणास तयार झाले. या कार्यात कुठेही वाईट अनुभव आले नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दमयंती पांढरीपांडे यांनी गांधींच्या स्वराज्याच्या संकल्पनेला जेपींनी आकार दिल्याची माहिती दिली. संचालन डॉ. नलिनी निसळ यांनी केले. (प्रतिनिधी)