शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारची जीपला धडक

By admin | Updated: May 4, 2017 01:58 IST

भरधाव कारने चुकीच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या जीपला जोरदार धडक दिली.

 नऊ जण गंभीर जखमी : कोंढाळी उड्डाणपुलावर अपघात कोंढाळी : भरधाव कारने चुकीच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या जीपला जोरदार धडक दिली. यात चार प्रवाशांसह नऊ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना कोंढाळी उड्डाणपुलाच्या उतारावरील विकासनगर टी-पॉर्इंटवर बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. वर्षा सुभाष ढोबाळे (३०), पार्बता चंद्रभान ढोबाळे (७०) दोन्ही रा. सावळी (खुर्द), ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा, माधुरी तातोडे (४०, रा. शाहूनगर, नागपूर), सोनबाजी सोमकुवर (३१, रा. मूर्ती, ता. काटोल) अशी जीपमधील जखमी प्रवाशांची नावे असून, कारमधील अमोल अनिल सावतकर (३७), गौरी अमोल सावतकर (३२), अवंती अमोल सावतकर (५), मधुकर भैयाजी वखरे (६२) व सुमेदा मधुकर वखरे (५५) जखमींची नावे आहेत. सविस्तर असे की, अमोल सावतकर हे आपल्या कुटुंबीयांसह एमएच-४९/बी-४३६४ क्रमांकाच्या कारने नागपूरकडून अमरावतीकडे जात होते. दरम्यान, कोंढाळी उड्डाणपुलाच्या उतारावर विकासनगर टी-पॉर्इंट येथे एमएच-३१/एजी-६१३५ क्रमांकाची प्रवासी वाहतुकीची जीप चुकीच्या दिशेने समोर आली. यामुळे भरधाव कारची जीपला धडक बसल्याने जीप महामार्गाच्या मधात उलटली तर कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. नागरिकांनी जखमींना जीपबाहेर काढून कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप चौगावकर पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर जखमींना नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी जीपचालक लक्ष्मण खुशालराव बोबडे (४०, रा. चंदनपार्डी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)