शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

जांबुवंतराव म्हणजे ‘विदर्भ’ होते

By admin | Updated: March 11, 2017 02:48 IST

विदर्भवीर जांबुवंतराव धोटे एक धाडसी आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व होते. त्यांना हिमालयाची उंची होती.

श्रद्घांजली सभा : श्रीहरी अणे यांचे गौरवोद्गार नागपूर : विदर्भवीर जांबुवंतराव धोटे एक धाडसी आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व होते. त्यांना हिमालयाची उंची होती. त्यांनी स्वतंत्र विदर्भाची चळवळ सर्वोच्च शिखरावर पोहोचविली होती. त्यामुळेच जांबुवंतराव म्हणजे ‘विदर्भ’ अशी त्यांची ओळख होती, असे गौरवोद्गार राज्याचे माजी महाधिवक्ता तथा विदर्भ मिररचे संस्थापक अ‍ॅड़ श्रीहरी अणे यांनी काढले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि विदर्भ मिरर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी स्व. जांबुवंतराव धोटे यांना श्रद्घांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरू न ते बोलत होते. टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून माजी खासदार विलास मुत्तेमवार, आ. आशिष देशमुख, हरिभाऊ केदार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, अ‍ॅड़ वामनराव चटप, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ अनिल किलोर, अ‍ॅड़ मुकेश समर्थ व विदर्भ माझा पक्षाचे प्रमुख राजकुमार तिरपुडे उपस्थित होते. यावेळी गिरीश गांधी यांनी जांबुवंतराव धोटे यांच्याशी जुळलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत, विदर्भ चळवळीतील जांबुवंतराव धोटे यांच्या योगदानाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, जांबुवंतराव म्हणजे, एक वादळी व्यक्तिमत्त्व होते. ते स्वभावाने आक्रमक वाटत होते, मात्र मनाने तेवढेच हळवे सुद्धा होते. जांबुवंतराव म्हणजे, माणसांचा एक समूहच होता. ते ज्या गल्लीतून जात तेथे शेकडो लोक गोळा होत होते. विदर्भाच्या आंदोलनात आता एवढा बहाद्दर नेता होणे नाही, असेही ते म्हणाले. हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ अनिल किलोर यांनी आपण सर्वांनी वेगळ्या विदर्भाचा लढा मोठा केला, तर ती जांबुवंतराव धोटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. यावेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र यांनीही यांच्याशी जुळलेल्या आठवणींना उजाळा देत, श्रद्घांजली अर्पण केली. दरम्यान आ. आशिष देशमुख, हरिभाऊ केदार, उमेश चौबे, अ‍ॅड़ वामनराव चटप, अ‍ॅड़ मुकेश समर्थ, राजकुमार तिरपुडे, अ‍ॅड़ रवी संन्याल व सुनील चोखारे यांनीही मनोगत व्यक्त करून जांबुवंतराव यांना श्रद्घांजली वाहिली. या शोकसभेचे संचालन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी केले.(प्रतिनिधी)