शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

तर ३०० बस सीएनजीत परिर्तनाला लागतील सात वर्षे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

दोन वर्षांत फक्त ८० बस परावर्तित : काम संथ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीकडे ...

दोन वर्षांत फक्त ८० बस परावर्तित : काम संथ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेली उपराजधानी प्रदूषणमुक्त व्हावी. यासाठी महापालिकेच्या डिझेलवर चालणाऱ्या शहर बस सीएनजीमध्ये परावर्तित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन वर्षांपूर्वी याला सुरुवात करण्यात आली; परंतु परिवर्तनाचे काम संथ असल्याने असल्याने आजवर फक्त ८० बस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात आल्या आहे. अशीच संथ गती कायम राहिल्यास ३०० बस सीएनजीत परिवर्तित करण्यासाठी पुढील सात वर्षे लागतील.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी ३८० बस सीएनजीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला होता. मनपाच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात ४६५ बस आहेत. यातील ८० बस गेल्या दोन वर्षांत परिवर्तित करण्यात आल्या आहेत. वास्तविक पहिल्या टप्प्यात १७३ व दुसऱ्या टप्प्यात २०७ बस परिवर्तित करण्याचे नियोजन होते.

विशेष म्हणजे, डिझेलवरील बस सीएनजीवर आणण्यासाठी मनपाचा निधी खर्च होणार नव्हता. हा खर्च बस सेवा संचालन करणाऱ्या कंत्राटदार कंपन्या करणार होत्या; परंतु मागील काही महिन्यांपासून कंत्राटदारांना मनपाने पैसे दिले नसल्याने त्यांनी हे काम थांबवले. याचा सीएनजी परिवर्तनाच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्यात मनपातील सत्तापक्षातील अंतर्गत वादात मागील काही महिन्यांपासून परिवहन सभापती पद रिक्त आहे. यामुळे बस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष आहे. प्रशासनही याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.

....

मनपाच्या बस सीएनजीमध्ये परिवर्तित केल्यास इंधनावरील खर्चात मोठी बचत होईल. दुसरीकडे बसचे आयुष्य वाढेल. पर्यावरण संवर्धन यामुळे ३८० बस सीएनजीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला. ८० बस परिवर्तित करण्यात आल्या. याला गती देण्याचा प्रयत्न आहे.

रवींद्र पागे, प्रशासकीय अधिकारी, परिवहन विभाग, मनपा

....

असे आहेत सीएनजी बसचे फायदे

-डिझेलच्या तुलनेत खर्च कमी

-प्रदूषण होत नसल्याने पर्यावरणपूरक वाहतूक

- बसच्या आयुष्यात पाच वर्षांनी वाढ

-कमी इंधनात अधिक धावते

-परिवहन विभागाचा तोटा कमी होण्याला मदत

............