शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या छत्रछायेत आजही बरसतात अखंड स्वरधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

नागपूर : लहानपणी समजायला लागले तेव्हापासून वडिलांचे आणि आजोबांचे गायन ऐकत मोठी झाले. स्वरज्ञान मिळाले. वयाच्या दहाव्या वर्षी गायला ...

नागपूर : लहानपणी समजायला लागले तेव्हापासून वडिलांचे आणि आजोबांचे गायन ऐकत मोठी झाले. स्वरज्ञान मिळाले. वयाच्या दहाव्या वर्षी गायला लागले. आजही गातच असते. सोबत वडिलांचेही गुरूच्या रूपाने मार्गदर्शन असते. खरंच मी तर स्वत:ला फारच भाग्यवान समजते. ही प्रतिक्रिया आहे, विदर्भातील प्रसिद्ध गायिका साधना शिलेदार यांची!

‘फादर्स डे’च्या निमित्ताने ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, आपले वडीलच गुरू असणे आणि त्यांच्या छत्रछायेत आपल्या कलेचा विस्तार करणे, ही मोठी भाग्याची गोष्ट असते. त्या भाग्याचा वाटा आपणाला मिळाला. वडील विवेक गोखले हे अमरावतीला सुप्रसिद्ध गायक आणि चित्रकार होते. चित्रकारितेपेक्षा त्यांचे गायनात नाव मोठे होते. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकही होते. त्यांचे वडील म्हणजे आपले आजोबा नारायणराव गोखले उपाख्य नानासाहेब हेदेखील प्रख्यात चित्रकार आणि गायक होते. बालगंधर्वांची पदे ते गायचे. ही गायनकला वडिलांमध्ये व आत्यामध्ये आली. वडिलांकडून ही कला वारसाहक्काने आपणास मिळाली. आजोबा आणि वडिलांकडून गायनातले बारकावे शिकता आले. सौंदर्यशास्त्राच्या अंगाने गायन आणि गाण्याबद्दलचा विचार त्यांनी शिकवला. लहानपणी काऊचिऊच्या गोष्टी ऐकत घास भरवण्याऐवजी वडील-आजोबांची गाणी ऐकवत आईने भरवले. संस्कार रुजले, स्वरज्ञान पक्के झाले.

आता वडिलांचे वय ७९ वर्षे आहे. आम्ही सारी मंडळी घरात एकत्रच नागपुरात असतो. सकाळ, सायंकाळ, सुटीचा दिवस आमच्याकडे स्वरांची बरसात असते. त्या स्वरानंदात आम्ही आजही चिंब होत असतो. वडिलांनी कधी बंधन लादले नाही. त्यांच्यात विचारांची मोकळीकता आहे. मी त्यांची मुलगी आणि शिष्या असूनही स्वत:च्या पीएच.डी.साठी गाइड म्हणून त्यांनी माझी निवड केली. त्या म्हणतात, वैचारिक प्रगल्भता यापेक्षा अजून किती मोठी शकते!