शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विरोधी कायदे रद्द केल्याशिवाय भले नाही

By admin | Updated: January 23, 2017 02:14 IST

भारतात लागू असलेले सिलिंग कायदा, जीवनावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहणाचा कायदा, हे तीन कायदे शेतकऱ्यांसाठी गळफास आहेत.

अमर हबीब : शेतकऱ्यांसाठी आत्मक्लेश आंदोलन नागपूर : भारतात लागू असलेले सिलिंग कायदा, जीवनावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहणाचा कायदा, हे तीन कायदे शेतकऱ्यांसाठी गळफास आहेत. या कायद्याचे दगड मानगुटीवर ठेवून शेतकऱ्यांच्या संरक्षणाच्या गोष्टी करण्यात अर्थ नाही. या कायद्याच्या बेड्या शेतकऱ्यांना संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या आहेत. या बेड्या तोडल्याशिवाय मदत आणि कल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत कधीच पोहोचणार नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने हे तीन कायदे तत्काळ रद्द करावेत, असे निवेदन शेती तज्ज्ञ आणि विचारवंत अमर हबीब यांनी केले. जनमंच या सामाजिक संस्थेसह विविध संघटनांतर्फे आत्मक्लेश अभियान-२०१७ अंतर्गत संविधान चौक येथे शेतकऱ्यांच्या मुलांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले. यावेळी अमर हबीब बोलत होते. कुणालाही त्याचा व्यवसाय करण्यास बंधन नाही. मात्र सिलिंग कायद्याने शेतकऱ्यांवर ते बंधन घातले आहे. जमीन अधिग्रहण कायद्याने शेतकऱ्यांना विचारात न घेता, त्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जातात. कोणत्याही वादळाचा फटका जसा दुबळ्या माणसांनाच बसतो, तसा नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नोटाबंदीच्या ५० दिवसानंतर पंतप्रधान शेतकऱ्यांसाठी काही मोठी घोषणा करतील, अशी आशा होती. मात्र त्यांनी ६० दिवसाच्या व्याजमाफीची घोषणा केली. ही घोषणा राजाला शोभणारी नाही तर चुकीने राजपद भेटलेल्या माणसांसारखी आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. यावेळी जनमंचचे अ‍ॅड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील, अभिजित फाळके, अ‍ॅड. सुभाष खंडागळे, प्रकाश इटनकर, सतीश देशमुख, अविनाश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. आंदोलनात जनमंच, लढा संघटना, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शेतकरी आधार फाऊंडेशन, संभाजी ब्रिगेड, भूमिपुत्र शेतकरी संघटना आदी संघटनांनी सहभाग घेतला. अभिजित फाळके यांनी प्रास्ताविक के ले. तीन वर्षे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी चांगले पीक आल्याने चांगले दिवस येतील, असे वाटत होते. मात्र नोटाबंदीने त्यांना पुन्हा संकटात टाकल्याची टीका त्यांनी केली.(प्रतिनिधी) शेतकऱ्यांवर नोटाबंदीचा वज्राघात नोटाबंदीच्या निर्णयाचे अल्पकालीन परिणाम अतिशय भयानक असून, यामध्ये शेतकरी पुरता कोलमडला आहे. प्रसार माध्यमांनी मध्यमवर्गीयांचे दु:ख मांडले, मात्र शेतकऱ्यांकडे कुणीही लक्ष दिले नाही. दोन वर्षे दुष्काळात गेल्यावर एक वर्ष चांगले पीक येते. तसे यावर्षी चांगले पीक आले होते. मात्र सरकारने ऐन हंगामाच्या काळात नोटाबंदीचा वज्राघात शेतकऱ्यांवर केला. क्रिकेटच्या स्कोअरप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मात्र कुणाला देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांना आधार देणारे कायदेही शेतकरीविरोधी आणि इतरांनाच फायदा देणारे आहेत. शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी केल्यावर गहजब करणाऱ्या उद्योगपतींना २४ लाख कोटींचे कर्ज माफ झाल्यावर ब्रही काढत नाही. सरकार कोणाचेही असो शेतकरीहिताचा विचार कुणी करीत नाही. या पार्श्वभूमीवर उपाययोजना झाल्या नाही तर प्रचंड संकटात सापडलेले शेतकरी पुन्हा आत्महत्या करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.