शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

आत्महत्येची धमकी देणाऱ्या पत्नीसोबत राहणे अशक्य

By admin | Updated: August 17, 2015 02:57 IST

मनात येईल तेव्हा आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या पत्नीसोबत एकाच घरात राहणे पतीला अशक्य आहे...

हायकोर्ट : आंतरजातीय विवाह करणाऱ्या पतीला घटस्फोटनागपूर : मनात येईल तेव्हा आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या पत्नीसोबत एकाच घरात राहणे पतीला अशक्य आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे. याप्रकरणात आंतर जातीय विवाह करणाऱ्या पतीला पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय वैध ठरविण्यात आला आहे. संबंधित पत्नीने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, ती सासरच्या सदस्यांना खोट्या फौजदारी प्रकरणात अडकविण्याची धमकी देत होती.सविता व सतीश (काल्पनिक नावे) यांनी आंतरजातीय विवाह केला होता. सतीश ब्राह्मण असून सविता बौद्ध आहे. दोघेही नागपूर येथील रहिवासी व व्यवसायाने डॉक्टर आहेत. शासकीय दंत महाविद्यालयात शिकत असताना त्यांचे प्रेम झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १८ नोव्हेंबर १९९४ रोजी त्यांचे लग्न झाले. यानंतर काही महिन्यांतच सविता क्रूरतेने वागायला लागली. एकदा तिने दिराला मारहाण केली व सासऱ्यावर हात उगारला. ती रोडवर उभी राहून सासरच्या सदस्यांना मानहानीजनक शिविगाळ करीत होती. ती स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आगपेटीसह घराबाहेर पडली होती. २८ जून १९९६ रोजी तिने गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सतीशने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात सविताने लेखी बयान सादर करून सर्व आरोप फेटाळून लावले होते. सतीशचे अनैतिक संबंध असल्यामुळे त्याला घटस्फोट हवा आहे असे तिचे म्हणणे होते. परंतु, तिला स्वत:चे म्हणणे पुराव्यांसह सिद्ध करता आले नाही. तिचे आरोप खोटे व आधारहीन ठरले. १४ डिसेंबर २००१ रोजी नागपूर कौटुंबिक न्यायालयाने सतीशची याचिका स्वीकारून घटस्फोट मंजूर केला. याविरुद्ध सविताने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अनंत बदर यांनी प्रकरणातील एकंदरीत तथ्ये लक्षात घेता कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवून सविताचे अपील फेटाळून लावले.(प्रतिनिधी)