शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या बाजारात वाहन पार्क करणे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:08 IST

दोन तासांनंतर अतिरिक्त शुल्क : निविदेतील रकमेत मोठा फरक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या बाजार विभागाने पार्किंग शुल्कात ...

दोन तासांनंतर अतिरिक्त शुल्क : निविदेतील रकमेत मोठा फरक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या बाजार विभागाने पार्किंग शुल्कात प्रचलित दराच्या तुलनेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तीन व पाचचाकी वाहनांच्या शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

मनपाच्या वर्ष २०१६च्या पार्किंग धोरणानुसार शुल्क आकारणीत सुधारणा केली आहे. दोन तास वाहन पार्किंग केल्यास प्रचलित शुल्क आकारले जाईल. त्यानंतर, ८ तासांसाठी शुल्कवाढ केली आहे. पार्किंग निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. लवकरच कंत्राट दिला जाणार आहे.

धरमपेठ झोनअंतर्गत सीताबर्डी येथील सुपर मार्केट, नेताजी मार्केट, हनुमाननगर झोन क्षेत्रातील सोमवारी पेठ बुधवार आठवडी बाजार, गांधीबाग झोनमधील महाल, बडकस चौक पार्किंग प्लाझाच्या शुल्क आकारणीत सुधारणा केली आहे. वर्ष २०२१-२२ साठी नवीन शुल्क लागू होतील, परंतु तासाच्या आधारावर शुल्कवाढ केली आहे. मात्र, निविदा रक्कम कमी करण्यात आली आहे.

सूपर मार्केटसाठी गेल्या वर्षी १०.५६ लाख रुपये निविदा रक्कम निर्धारित केली होती. पार्किंग धोरणांतर्गत या वर्षी निविदा रक्कम ६.७१ लाख रुपये निर्धारित केली आहे. नेताजी मार्केटची निविदा रक्कम ३.३२ लाखांवरून ५.७७ लाख रुपये करण्यात आली आहे. बुधवार बाजाराची निविदा रक्कम ११.३६ लाख होती. ती ६.१६ लाख रुपये करण्यात आली. महाल पार्किंग प्लाझाची निविदा रक्कम ६.२८ लाख रुपये होती. ती ९.४९ लाख रुपये करण्यात आली आहे.

...

तीन व पाचचाकी वाहन शुल्कात घट

पार्किंग धोरणांतर्गत तीन, पाचचाकी व व्यावसायिक वाहनांच्या पार्किंग शुल्कात कपात केली आहे. आधी २० रुपये शुल्क होते. आता दोन तासांसाठी ५ रुपये तर ८ तासांसाठी १० रुपये शुल्क आकारले जाईल.

...

वाहनजुने शुल्कनवीन शुल्क आकारणी

सायकल, हाथठेला २ रुपयेदोन तासांसाठी २ रुपये, तर ८ तासांसाठी ५ रुपये

दुचाकी ५ रुपये दोन तासांसाठी, ८ तासांसाठी १० रुपये

चारचाकी १० रुपये दोन तासांसाठी १० रुपये, ८ तासांसाठी २० रुपये

तीन व पाचचाकी १० रुपयेदोन तासांसाठी ५ रुपये, ८ तासांसाठी १० रुपये

......................