शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आरा यंत्रांना नियमबाह्य परवानगीचे प्रकरण वन विभागात वादग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 07:00 IST

saw machines Nagpur News राज्य सरकारने आरा गिरण्यांना परवाने देण्याचे प्रकरण नियमबाह्य असेल तर कारवाई करा आणि परवाने रद्द करा, असे आदेश दिले होते. मात्र वन मुख्यालयाने यावर ठोस भूमिका घेतली नसल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देवन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ२०१८ मधील परवान्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत तत्कालीन वनबल प्रमुखांनी राज्यातील ५० पेक्षा अधिक आडव्या आरा गिरण्यांना परवाने दिले होते. मात्र हे परवाने नियमबाह्य असल्यासंदर्भात न्यायालयात प्रकरण गेल्याने आता वन विभागामध्ये नियमांची पुस्तके आणि फाईल चाळणे सुरू झाले आहे. परवाने देताना घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे हे प्रकरण आता वादग्रस्त ठरायला लागले आहे.२३ जुलै २०१८ ला वन विभागाच्या झालेल्या बैठकीत या आरा गिरण्यांना परवाने देण्यात आले होते. तत्कालीन प्रधान मुख्यवन संरक्षक (वनबल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला होता. प्रत्यक्षात बंगळूर येथील भारतीय वनिका अनुसंधान आणि शिक्षा परिषदेचा लाकडाच्या उपलब्धतेचा अहवाल आल्याशिवाय आडव्या आरा यंत्रांना परवानगी देऊ नये, असा निर्णय २७ जून २०१७ च्या बैठकीत झाला होता. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून २३ जुलै २०१८ च्या बैठकीत वन विभागाने हे परवाने दिले. त्यामुळे हे प्रकरण वादात सापडले आहे. या संदर्भात झालेल्या तक्रारीनंतर राज्य सरकारने दखल घेऊन २४ ऑगस्ट २०१९ ला वन विभागाला पत्र दिले होते. त्यात आरा गिरण्यांना परवाने देण्याचे प्रकरण नियमबाह्य असेल तर कारवाई करा आणि परवाने रद्द करा, असे आदेश दिले होते. मात्र वन मुख्यालयाने यावर ठोस भूमिका घेतली नसल्याचे सांगितले जात आहे.

सध्या हे प्रकरण न्यायालयात गेले असून त्यावर वन विभागाला बाजू मांडायची आहे. यासाठी अलिकडेच गुरूवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. रामबाबू यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती. अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक संजीव गौंड, मुख्य वनसंरक्षक एस.एस. दहीवले, नागपूर मुख्य वन संरक्षक कल्याणकुमार या बैठकीला उपस्थित होते. परवाने देताना नियमांची पायमल्ली झाल्याचा निष्कर्ष बैठकीत निघाल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालय अपिलावर जो निर्णय घेईल, त्यानंतरच राज्यस्तरीय समिती घेण्याची शक्यता आहे. सध्यातरी परवाने रद्द करण्यासंदर्भात कसल्याही हालचाली नाही.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग