शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्प गैरव्यवहार : संजय खोलापूरकरांविरुद्धचे आरोपपत्र रद्द

By admin | Updated: March 10, 2017 21:26 IST

सिंचन प्रकल्प गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी संजय लक्ष्मण खोलापूरकर यांच्याविरुद्धचे आरोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तांत्रिक कारणावरून रद्द केले.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 10 - सिंचन प्रकल्प गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी व सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता संजय लक्ष्मण खोलापूरकर यांच्याविरुद्धचे आरोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तांत्रिक कारणावरून रद्द केले. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी हा निर्वाळा दिला. ३० ऑगस्ट २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार विद्यमान व सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १९७ अनुसार शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या निर्णयाचे उल्लंघन करून खोलापूरकर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. 
 
ही चूक खोलापूरकर यांच्या पथ्यावर पडली. त्यांच्याविरुद्ध २ सप्टेंबर २०१६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(१)(क)(ड), १३(२) व भादंविच्या कलम ४२०, १२०-ब, १०९ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. हे आरोपपत्र रद्द करण्यासाठी खोलापूरकर यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मंजूर झाला. असे असले तरी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला शासनाची परवानगी घेऊन खोलापूरकर यांच्याविरुद्ध पुन्हा आरोपपत्र दाखल करता येईल असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले आहे. परिणामी खोलापूरकर यांच्याविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा आहे.  
 
खोलापूरकर यांनी २०१३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यापूर्वी ते गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात ऑगस्ट-२००६ ते जुलै-२०१० पर्यंत कार्यरत होते. दरम्यान, त्यांनी शासकीय निधीचा योग्य खबरदारी घेवून विनियोग केला नाही. यशस्वी कंत्राटदाराच्या लाभाकरिता पदाचा दुरुपयोग केला. पूर्व अर्हता अर्ज छाननीच्या वेळी गुणांकन तक्ते तयार करताना पुणे येथील अपात्र कंत्राटदार श्रद्धा कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड पॉवर जनरेशन कंपनीला जादा गुण देऊन स्पर्धेकरिता नियमबाह्यपणे पात्र ठरविले. निविदा अद्ययावतीकरण करताना नियमबाह्य बाबींचा समावेश करून निविदेचे मुल्य ७ कोटी ३८ लाख ६६ हजार रुपयांनी वाढविण्याची शिफारस केली असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आरोप आहेत. खोलापूरकर यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. श्याम देवानी व अ‍ॅड. राजेंद्र डागा तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता शिशिर उके यांनी कामकाज पाहिले.