शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूची चौकशी करा

By admin | Updated: May 8, 2017 02:16 IST

तरुण मुलाच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, यासाठी वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

वडिलांची हायकोर्टाला विनंती : पोलीस वाहनाने धडक दिल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तरुण मुलाच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, यासाठी वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. युवराज भय्याजी नासरे असे वडिलांचे नाव असून ते धन्वंतरीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलाचे नाव अजिंक्य (१९) होते. तो रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. पोलीस वाहनाने धडक दिल्यामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला असून, या प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळे वळण देण्यात आल्याचा नासरे यांचा आरोप आहे. २८ जुलै २०१६ रोजी अजिंक्य नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघाला होता. त्याच्याकडे मोटरसायकल होती. दरम्यान, जुना काटोल नाक्यावर अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविली. अजिंक्यने गाईला धडक दिली. त्यामुळे तो रस्ता दुभाजकावर आदळून ठार झाला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. परिणामी अजिंक्यविरुद्धच भादंविच्या कलम २७९ व ३३८ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. परिस्थितीजन्य पुरावे व अजिंक्यच्या शरीरावरील जखमा पाहता त्याला वाहनाने धडक दिल्याचे स्पष्ट होते. ते वाहन पोलिसांचे होते, असा दावा नासरे यांनी केला आहे. अजिंक्यच्या हातावर वाहनाचे चाक गेल्याच्या खुणा होत्या. रोडच्या मधोमध त्याच्या रक्ताचे डाग होते, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. नासरे जुलै-२०१६ पासून सतत या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असून, त्यावर समाधानकारक कारवाई करण्यात आली नाही. नासरे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. परिणामी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रकरणाचा विशेष यंत्रणेमार्फत तपास करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. पोलीस आयुक्तांना नोटीस उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त झोन-२ व गिट्टीखदान पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून २१ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.