शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखत कक्ष बनले भ्रष्टाचार कक्ष

By admin | Updated: April 12, 2015 02:41 IST

निलंबित अधीक्षक वैभव कांबळे, पारेकर आणि आत्राम हे स्वत:च्या मर्जीने मुलाखत कक्षात कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत होते.

निलंबित अधीक्षक वैभव कांबळे, पारेकर आणि आत्राम हे स्वत:च्या मर्जीने मुलाखत कक्षात कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत होते. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून आठवड्यातून दहा हजार रुपये हे या अधिकाऱ्यांना मिळत होते. श्रीकृष्ण राहाटे, गोपाल कचरे, उदय जाधव आणि अशोक भंडारकर, हे त्यांच्या खास मर्जीतील कर्मचारी होते. त्यापैकी भंडारकर हा निलंबित झाला आहे. नियमाप्रमाणे न्यायाधीन बंद्याची मुलाखत त्याच्या नजीकच्या नातेवाईकाला आठवड्यातून केवळ एकच दिवस घेता येते. मुलाखतीचा वेळ केवळ दहा मिनिटे असतो. शिक्षा झालेल्या कैद्याची मुलाखत महिन्यातून केवळ एकदाच दिली जाते. परंतु हे कर्मचारी राजा गौस, भास्कर अण्णा, डल्लू सरदार, भुरू आणि अन्य भाई लोकांची त्यांच्या नातेवाईकांना व साथीदारांना आठवड्यातून चार-पाच दिवस मुलाखती देत होते. या मुलाखतीही तास-दोन तास राहत होत्या. प्रत्येक मुलाखतीचे दोन ते तीन हजार रुपये घेतले जात होते. कारागृहात आवकच्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून जेलर रणदिवे, आशिष आणि सचिन नावाचे कर्मचारी वसुली करायचे. वसुली पथक म्हणूनच त्यांची कारागृहात ओळख आहे. राजा गौस आता अंडासेलमध्येमोक्काच्या प्रकरणातील राजा गौसचे तीन साथीदार आणि अन्य दोघे, असे एकूण पाच जण ३१ मार्च रोजी कारागृहातून पळून गेल्याचे उघडकीस येताच राजा गौसला पुन्हा छोटी गोलमधून अंडासेलमध्ये टाकण्यात आले आहे. सहा-सात महिन्यापूर्वीच मोठी रक्कम घेऊन त्याला अंडासेलमधून काढून छोटी गोलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला खास निगराणीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतरच त्याला अंडासेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला छोटी गोलमध्ये ठेवून न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्यात आला. छोटी गोलमध्ये शिक्षा झालेल्यांना आणि खतरनाक न्यायाधीन बंद्यांना ठेवले जाते. बडी गोलमध्ये सर्वच न्यायाधीन बंदी ठेवले जातात. टोळीवाल्यांना वेगवेगळ्या बराकीत ठेवले जाते. परंतु मोठी रक्कम घेऊन टोळीतील गुन्हेगारांना एकत्र ठेवले जात होते. पुन्हा आढळले मोबाईलगडचिरोली कारागृहाचे अधीक्षक आडे आणि त्यांच्या पथकाने शनिवारी सकाळी कारागृहाची झडती घेतली. त्यांना प्रेस (मुद्रणालय) या ठिकाणी सहा मोबाईल, सहा चार्जर, बॅटऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आली. या शिवाय छोटी गोलमध्ये दोन आणि बडी गोलमध्ये एक मोबाईल आढळून आला.